वारी २०१९ : विठूरायाचे ‘मुख’दर्शन घेणे झाले ‘सोपे’, भक्त ‘सुखावले’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या महाराष्ट्रात विठूरायाच्या आणि त्याच्या भक्तांच्या वारीचे वातावरण आहे. आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर पंढरपूर हे विठ्ठल भक्तांनी गजबजून जाणार आहे. एकादशीच्या दिवशी विठूरायाच्या दर्शनासाठी भलीमोठी गर्दी असते त्यामुळे कोणाला दर्शन मिळते नाहीतर कोणाला दर्शन मिळत नाही. त्यामुळे आषाढीला येणाऱ्या भक्तांसाठी मंदिर समितीने विठूरायाच्या मुखदर्शनासाठी खास उंच प्लॅटफॉर्म तयार करुन घेतला आहे.

मंदिर समितीने केलेल्या या व्यवस्थेमुळे प्रत्येक भाविकाला देवाचा चेहरा दिसू लागला आहे, त्यामुळे भाविकही सुखावला आहे. कारण गर्दीच्या वेळी विठुरायाच्या दर्शनासाठी भक्त २०-२० तास रांगेत थांबायचे. मात्र ज्या भक्तांना रांगेत थांबणे जमत नाही ते मुखदर्शनासाठी गर्दी करायचे. परंतू मंदिर प्रशासनाने पूर्वी केलेल्या व्यवस्थेत देवाचा चेहराही भाविकांना दिसत नव्हता.

विठुरायाच्या मंदिराचा गाभारा लहान व कमी उंचीचा असल्याने मुखदर्शन करताना कमी उंचीच्या माणसाला गाभाऱ्यातील देव दुरून दिसायचा नाही. याची तक्रार वारंवार भाविकांकडून होऊ लागल्यानंतर मंदिर समितीने खास उंच प्लॅटफॉर्म बनवला आहे. त्यामुळे आता सर्व भक्तांना विठ्ठलाचे मुखदर्शन होणार आहे. त्यामुळे भक्तही सुखावले आहे. आणि मुखदर्शनासाठी भक्त गर्दी करत आहे.

दरम्यान, सिंहगड इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी मुखदर्शनासाठी नवीन पायऱ्यांचा लाकडी प्लॅटफॉर्म डिझाईन करुन बसविले आहे. भाविकांना या पायऱ्यांवर चढून देवाचे नीट दर्शन होणार आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी मुखदर्शनासाठी वाढू लागला आहे. कारण कमी उंचीच्या महिलांनाही आता देवाचे स्पष्ट दर्शन होणार आहे.

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई