Bhojpuri Holi video Song : आम्रपालीचं होळीचं गाणं लॉन्च, सोशलवर ‘धम्माल’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अदाकारा आम्रपाली दुबे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आम्रपाली दुबेचं पहिलं भोजपुरी होळीवरील गाणं लाँच करण्यात आलं आहे. खास बात अशी की, या गाण्यानं लाँच होताच सोशलवर धुमाकूळ घातला आहे. काही तासातंच या गाण्याला 1 लाख 80 हजार व्ह्युज मिळाले आहेत. हजारो लोकांनी हे गाणं लाईक केलं आहे. होलिया में लागे बडी डर असं या गाण्याचं नाव आहे.

गाण्याबद्दल बोलायचं झालं तर भोजपुरी सिंगर खुशबू जैननं हे गाणं गायलं आहे. या गाण्यात आम्रपालीनं केलेला डान्सही चाहत्यांना खूप आवडला आहे. पांढऱ्या रंगाच्या घागऱ्यात आम्रपाली कमालीची सुंदर दिसत आहे. मोकळ्या केसांमुळं आम्रपालीच्या लुकला चार चांद लागले आहेत यात शंका नाही. आम्रपालीच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेतात.

आम्रपाली दुबेचं हे गाणं सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. होळीचं हे गाणं अनन्या क्रॉफ्ट अँड व्हिजन म्युझिकं रिलीज केलं आहे. पवन पांडेनं गाणं लिहिलं आहे तर आजाद सिंहनं या गाण्याला म्युझिक दिलं आहे.

आम्रपाली दुबेच्या वर्कफ्रंटबद्ल बोलायचं झालं तर 2014 साली आलेल्या निरहुआ रिक्शावाला या सिनेमातून लोक तिला ओळखू लागले. उत्तर प्रदेशातील गोरखपूरची रहिवासी असलेल्या आम्रपाली दुबे हिला 2015 मध्ये बेस्ट डेब्यु अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आहे.

You might also like