‘निरहुआ’ च्या गाण्यात ‘नागिन’ धुनची कमाल, रिलीज होताच सोशलवर ‘राडा’ (व्हिडीओ)

 पोलीसनामा ऑनलाईन टीम – भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआच्या नागिन धुनवाल्या नव्या भोजपुरी गाण्यानं रिलीज होताच धुमाकूळ घातला आहे. हे गाणं तसं तर 15 मार्च रोजीच रिलीज झालं आहे. रिलीज होताच हे गाणं व्हायरल झालं आहे. लभर कहतिया सॉरी असं या गाण्याचं नाव आहे. आर आर पंकज विश्वास यानं हे गाणं लिहलं आहे. विनय विनायकनं हे गाणं कंपोज केलं आहे.

या गाण्यात निरहुआचा शानदार डान्स दिसत आहे. या गाण्यात नागिन धुनचा वापर केला आहे ज्यामुळं गाण्याला चार चांद लागले आहेत. रिलीज झाल्याच्या काही तासांतच हे गाणं लोकांपर्यंत झपाट्यानं पोहोचताना दिसत आहे.

https://youtu.be/e8AWttpJLGk

निरहुआ एकापाठोपाठ एक हिट गाणी देताना दिसत आहे. अलीकडेच होळीला त्याचं एक गाणं रिलीज झालं होतं. सूचना जारी बा असं या गाण्याचं नाव होतं. या गाण्यानंही खूप अटेंशन घेतलं होतं. या गाण्यात अनेक राजकारण्यांच्या नावाच्या घोषणाही पहायला मिळाल्या आहेत. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. त्याच्या या गाण्यात कलम 370चा देखील उल्लेख होता. या गाण्याला 50 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.