नवजात बाळाच्या आईने आवर्जून खावेत ‘हे’ पदार्थ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बाळांतपणानंतर मातेने स्वताची काळजी घेतली पाहिजे. कारण मातेच्या आरोग्यावरच बाळाचे आरोग्य आवलंबून असते. बाळ आईचे दूध पित असल्याने आईच्य आहारावर त्याचे पोषण होत असते. बाळासाठी आईचे दूध लाभदायक असते. आईच्या दुधातून बाळाला अनेक जीवनसत्त्वे मिळतात. भरपूर जीवनसत्व असणारे दूध तयार होण्यासाठी आईन काही पदार्थांचे सेवन केल पहिजे. यामुळे आई आणि बाळ दोघांना लाभ होतो.

लसूणातील अँटिऑक्सिडंट्स स्तनपान देणाऱ्या आईला इन्फेक्शनपासून दूर ठेवतात. यामुळे दूध तयार होण्याची क्रियाही वाढते. अंड्यात प्रोटीन, व्हिटॅमिन-डी असते. यामुळे बाळाची वाढ योग्य प्रकारे होते. त्यामुळे आईन अंडी खाल्ली पाहिजेत. तसेच पनीरचे सुद्धा सेवन केले पाहिजे. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी, प्रोटीन असते. यामुळे बाळाची हाडे मजबूत होतात. पालक सुद्धा आई आणि बाळासाठी पोषक आहे. यामध्ये फॉलिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन्स असतात. यामुळे बाळाच्या मेंदूची वाढ योग्य पद्धतीने होते. तसेच राजमा खाल्ल्यानेही बाळाला लाभ होतो. यामध्ये प्रोटीन, आयर्न असते. हे स्तनपान करणाऱ्या मातेला रक्ताची कमतरता येऊ देत नाही.

बाळांतपणानंतर मातेने व्हेजिटेबल सूप नियमित घेतले पाहिजे. यामध्ये आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम असते. यामुळे दूध तयार होण्याची प्रक्रिया वाढते. तूपदेखील बाळ आणि आईसाठी लाभदायक आहे. यामध्ये गुड फॅट्स, फायबर्स असतात. यामुळे बाळाची वाढ चांगली होते. बाळ आणि आईला पोटाच्या समस्या होत नाही. दह्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, मिनरल्स असते. यामुळे बाळाची वाढ चांगली होते. बदाममधील अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्सने कमजोरी दूर होते. बाळ आणि आईला एनर्जी मिळते. डाळतील फायबर्स, कार्बोहायड्रेट्सने एनर्जी मिळते. बाळ तरतरीत होते.