Pune News : पुण्यातील खराडीत जन्मदात्यांनी नकोशीला बेवारस सोडलं पण पोलिसांनी आपलंस केलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जन्मदात्यानी चिमुरडीला बेवारस सोडले; पण पोलिसांनी तिला आपलेसे केले आहे. शहरात लहान मुलांना रस्त्यावर सोडून देण्याच्या घटना वाढत आहेत. पण, यात पोलिसांना त्या क्रूर माता-पित्यांचा शोध लागत नसल्याचे देखील चित्र आहे.

याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खराडीत एका दर्ग्यात दोन महिन्यांच्या चिमुरडीला बेवारसरित्या सोडले असल्याची माहिती चंदननगर पोलीसाना मिळाली. यानंतर दामिनी पथकाला ही माहिती दिली. त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता काळे व दामिनी मार्शल उज्जवला बनकर आणि सुवर्णा वाळके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाळाला जवळ घेतले. यादरम्यान हे बाळ डाहो फोडत होत. दमीनीच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्याला जवळ घेताच तीच रडणं थांबल. मग तिला घेऊन हे पथक ठाण्यात आणल आणि त्यांनी सुशृषा केली. त्यानंतर दुध पाजून दोन महिन्यांच्या चिमुरडीला आपलेसे केले. पोलीस आता त्या माता पित्याचा शोध घेत आहेत.