शिरूर तालुक्यात नवजात अर्भक आढळलं, परिसरात खळबळ

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर तालुक्यातील काठापुर येथे रस्त्यांच्या कडेला एक नवजात बालिका (अर्भक) सापडले असुन, ग्रामस्थांनी पाहील्यानंतर तात्काळ रूग्नालयात दाखल केल्याने मुलीचे प्राण वाचले आहे.

याबाबत काठापुरचे सरपंच बिपीन थिटे यांनी सांगितले की, काठापुर शिंगवे-पारगाव रस्त्यांच्या कडेला शेताच्या बांधावर हे नुकतेच जन्मलेले हे अर्भक कपड्यामध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते. हे बालक यशवंत केदारी व सुशिलाबाई झिंग्रे हे शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांनी पाहीले. त्यानंतर सरपंच बिपीन थिटे यांच्यासह विकास दाते, संभाजी लोंढे, पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांनी तत्काळ टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाला घेऊन आले.

baby

तेथे वैद्यकीय अधिकारी कृष्णा चव्हाण व सेविका मंगल मेचे घोडे यांनी तत्काळ तपासणी केली. डॉ. चव्हाण म्हणाले की, मुलीची तब्येत चांगली असुन, तिचा जन्म पहाटेच्या सुमारास झाला असण्याची शक्यता आहे. पोलिस नाईक संजय जाधव, अजित पवार यांनी तत्काळ मुलीला ताब्यात घेऊन, तिला पुढील उपचारासाठी ग्रामीण रूग्नालयात पाठविण्यात आले. या अर्भकाला टाकुन दिल्या प्रकरणी अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बागायती भागामधील ही दुदैवी घटना

टाकळी हाजी बेट भागासह काठापुर हे समृद्ध गाव असुन, या भागामधे प्रथमच मुलगी झाली म्हणुन, रस्त्यावर टाकुन देण्याची घटना घडल्याची शक्यता असुन, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रीया जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांनी व्यक्त केली असुन, ज्यांना मुलगी नकोशी झालीय तिच्या शिक्षणासह लग्नापर्यन्तचा खर्च मी स्वतः करते पण मुलीला असं रस्त्यावर टाकू नका असं आवाहन त्यांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like