धक्‍कादायक ! ‘आयटी हब’च्या परिसरातून जाणार्‍या ‘मुठा’ नदीवर नव्याने बांधलेल्या पुलाला ‘तडे’, वाहतूक बंद

पुणे (हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाईन – हिंजवडीकडून वाकडकडे येण्यासाठी मुठा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याने हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याने शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले असून हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने हिंजवडीकडे जाणाऱ्या चाकरनाम्यांचे हाल होत आहेत.

हिंजवडी येथील मुंबई एक्सप्रेस-वेला जोडण्यासाठी आणि वाकड आणि हिंजवडीकडे जाण्यासाठी मुठा नदीवर पुल बांधण्यात आला आहे. पाच महिन्यांपूर्वीच या पुलाचे उद्धघाटन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, पहिल्या पावसातच या पुलाला तडे गेल्याने या पुलाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे असल्याचे दिसून येत आहे. हा पूल बाधणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

आयटीहब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये दररोज लाखो लोक कामाच्या निमीत्ताने ये-जा करीत असतात. नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने या ठिकाणी मुठा नदीवर पुल बांधण्यात आला आहे. याच ठिकाणी असलेल्या सर्व्हीस रोडवरून अनेक चाकरनामे ये-जा करीत असतात. त्यातच या पुलाला तडे गेल्याने पुलावरील आणि सर्व्हीस रोडवरील वाहतूक बंद केल्याने या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आरोग्यविषयक वृत्त