खुशखबर ! १ लाख रूपये ‘गुंतवणूक’ करून ‘हा’ व्यवसाय करा अन् मिळवा ६० लाखाचं उत्पन्‍न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याजवळ स्वतःची जमीन आहे आणि तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक नवीन व्यवसाय आम्ही घेऊन आलो आहोत. या व्यवसायात तुमच्याकडे स्वतःची शेतजमीन असणे महत्वाचे आहे. या व्यवसायामध्ये तुम्ही चंदनाच्या झाडांची लागवड करून मुबलक प्रमाणात पैसे मिळवू शकता. चंदनाच्या लाकडांना एक किलोला ८ ते १० हजार रुपये भाव मिळत आहे. तर विदेशात हेच लाकूड २० ते २५ हजार रुपये किलोने विकले जात आहे. या शेतीसाठी तुम्हाला केवळ ८० हजार ते १ लाख रुपये जवळ असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही या व्यवसायातून कमीत कमी ६० लाख रुपयांचे उत्त्पन्न मिळवू शकता.

विदेशात मोठी मागणी
सफेद चंदनाच्या लाकडापासून निघणारे तेल आणि लाकूड या दोन गोष्टींचा औषधे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. त्याचबरोबर साबण, कॉस्मेटिक्स,आणि पर्फ्यूम बनवण्यासाठी या सफेद चंदनापासून निघणाऱ्या तेलाचा वापर करण्यात येतो. तसेच चंदनाची हि शेती कायदेशीर असून यासाठी सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याचे माहिती मिळत आहे.

एका झाडापासून १० किलो लाकूड
चंदनाच्या एका झाडापासून तुम्हाला सरासरी १० किलो लाकूड मिळू शकते. जर तुम्ही एक एकराच्या जमिनीवर चंदनाच्या झाडांची लागवड केल्यास तुम्हाला यामधून जवळपास ६०लाख रुपयांची कमाई मिळू शकते. मात्र तुम्हाला यासाठी कमीतकमी १० ते १२ वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. झाडांना पूर्ण वाढ होण्यासाठी इतका वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे नैसर्गिक शेती केल्यास यासाठी तुम्हाला २० ते २५ वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

शेतीसाठी लागणार ‘या’ गोष्टी
या व्यवसायासाठी तुमच्याकडे एक ते दोन एकर शेतजमीन हवी. त्यानंतर चंदनाची रोपे खरेदी करण्यासाठी, खतांसाठी आणि इतर खर्चांसाठी तुम्हाला जवळपास एक लाख रुपये खर्च येईल. त्याचबरोबर इतर रोपट्यांपेक्षा चंदनाची रोपे ही महाग असतात. त्यामुळे तुमच्या भांडवलात वाढ देखील होऊ शकते.

 

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय