मोदी सरकारच्या मदतीनं ‘फक्त’ 50 हजारात सुरू करा व्यवसाय, ‘भरघोस’ कमवण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात राष्ट्र्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांसाठी टोल नाक्यावर एक विशेष नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 15 डिसेंबर 2019 पासून टोल नाक्यावरुन जाणाऱ्या गाड्यांवर FASTag लावणे अनिवार्य झाले आहे.

टोल नाक्यांवर होणारी वाहनांची गर्दी, लांबच लांब रांगा आणि त्यातून वाढणारे प्रदुषण या सर्वांना आळा घालण्यासाठी हा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. डिजिटल पेमेंटला प्रोस्ताहन देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. आता टोल नाक्यावरुन जाताना तुम्हाला फास्टॅग वापणे अनिवार्य आहे. परंतू सरकारच्या या निर्णयाचा फायदा तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करण्यासाठी करता येईल. सरकारच्या या निर्णयातून तुम्ही लाखो रुपये कमावू शकतात.

काय आहे व्यवसाय –

15 डिसेंबरपूर्वी सर्व चारचाकी आणि त्यापेक्षा जास्त चाकी वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य आहे. अशा वाहनांना तुम्ही 15 डिसेंबरच्याआधी फास्टॅग विकू शकतात.

फक्त एक लॅपटॉप प्रिंटरची आवश्यकता –

फास्टॅग पॉइंट ऑफ सेल एजंट होण्यासाठी तुम्हाला 3 सर्वात महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. संगणक आणि त्यातील काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. लॅपटॉप शिवाय डेस्कटॉप, प्रिंटर आणि बायोमॅट्रिक डिवाइस असणे आवश्यक आहे. या कामासाठी आरटीओ एजंट, कार डीलर, ट्रांसपोर्ट, पीयूसी सेंटर, फ्युलिंग स्टेशन, कार डेकोर, सेल एजंट असा काही अनुभव असणे आवश्यक आहे. अशांना प्राधान्य दिले जाईल. यातून तुम्हाला जवळपास 50 लाख रुपयापर्यंत कमाई करण्याची संधी मिळेल.

फॉस्टॅग काय आहे आणि कसे वापरले जाते –

ही एक इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन यंत्रणा आहे. फास्टॅगची ही सुविधा राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आली आहे. ही यंत्रणा रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन प्रिंसिपलवर काम करते. वाहनाच्या विंडस्क्रीनवर फास्टॅग लावण्यात येतो. वाहन टोल नाक्यावर जाताच तेथे लावलेल्या सेंसरद्वारे फास्टॅग स्कॅन होतो. एकदा लावलेला फास्टॅग 5 वर्षांसाठी वैध आहे. यासंबंधित आधिक माहिती https://nict.ind.in/index.html या वेबसाईटवरुन मिळवू शकतात.

Visit : Policenama.com