Bajaj Pulsar 125 चे ‘BS6’ व्हेरिएंट भारतमध्ये ‘लाँच’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bajaj Pulsar 125 चे नियॉन व्हेरिएंट्स आता BS6 ने सुसज्ज झाले आहे, आणि हे Pulsar Model चे सर्वात किफायतशीर मॉडेल आहे. ज्याच्या ड्रम व्हेरिएंट ची किंमत 68,762 रुपये इतकी असून डिस्क व्हेरिएंट ची किंमत 73,088 रुपये इतकी आहे. जुन्या BS4 व्हेरिएंटच्या नुसार नव्या BS6 ड्रम व्हेरिएंट ची किंमत आता 5,178 रुपयांपेक्षा जास्त आणि डिस्क व्हेरिएंट ची किंमत 6,502 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

ऑटोकारमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, डिलर्सचे म्हणणे आहे की Pulsar 125 च्या किमतीत वाढ यामुळे देखील झाली आहे कारण ती आता कार्बोरेटरपासून फ्यूल इंजेक्शन टेक्नॉलॉजी मध्ये बदलत आहे. याबरोबरच यामध्ये एक्झॉस्ट सिस्टम देखील देण्यात आली आहे. BS6 प्रमाणेच Bajaj Pulsar 220F आणि Pulsar NS200 ला देखील कंपनीने BS6 वरून अपडेट केले आहे. तथापि, या मॉडेल्समध्ये कोणतेही कॉस्मेटिक बदल करण्यात आलेले नाहीत.

सध्या Pulsar 125 मध्ये सध्या 124.38 cc चे सिंगल – सिलिंडर, एअर कूल्ड, 2 – व्हॉल्व्ह इंजिन देण्यात आले आहे आणि हे इंजिन 8,500 rpm वर 12 hp आणि 6,500 rpm वर 11 Nm चा टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 – स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनने सुसज्ज असे आहे. कॉम्पिटीशन बाबत बघितलं तर ही बाईक Honda SP 125 ला जोरदार टक्कर देईल ज्याच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 72,900 रुपये आहे आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 77,100 रुपये इतकी आहे.

Pulsar 125 Neon मध्ये फीचर्स च्या रूपात क्लास लिडिंग, शार्प आणि स्पोर्टी स्वरूपात दिसण्यासाठी क्लिप – ऑन हँडलबार देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त यामध्ये 5 – स्पीड गिअरबॉक्स सहित एक प्रायमरी किक देखील दिली गेली आहे, ज्यामुळे बाईकस्वार कोणत्याही गिअरमध्ये क्लच दाबून बाइक सुरू करू शकणार आहे. या व्यतिरिक्त दुसरे खास वैशिष्ट्य म्हणजे ती टॉप स्पीड मध्ये देखील कमी व्हायब्रेशन करते. ही बाईक Neon Blue, Solar Red आणि Platinum Silver या तीन कलर मध्ये एक ड्रम आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटच्या निवडीसह उपलब्ध असणार आहे.