भारतात लाँच झाली इलेक्ट्रिक बाईक; एकदा चार्ज केल्यावर 110 KM धावेल, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात दुचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे पेट्रोलच्या किमतीत वाढ होत आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसतो. मात्र, आता याच पार्श्वभूमीवर पेट्रोलविना धावणारी इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्यात आली.

इलेक्ट्रिक मोबिलीटी आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक बाईकची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानुसार, आता Energy EV ने तीन नवी इलेक्ट्रिक वाहने लाँच केली आहेत. कंपनीने आज (बुधवार) Glyde+, Evolve Z आणि Evolve R इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे.

या बाईकला एकदाच (सिंगल चार्ज) चार्ज केल्यावर तब्बल 110 किमीपर्यंतचे अंतर धावू शकेल. Glyde+ या बाईकची किंमत 92,000 रुपये आहे तर Evolve Z एक स्ट्रीट बाईक आहे. याची किंमत 1.3 लाख रुपये आहे. याशिवाय Evolve R ही बाईक स्क्रॅम्बलर बाईकसारखीच दिसते. याची किंमत 1.42 लाख रुपये आहे. या तिन्ही बाईकच्या ऑनरोड किंमती आहेत.

असे आहेत या बाईकचे फिचर्स :
– Earth Glide + मध्ये कंपनीने 2.4 W इलेक्ट्रिक मोटारचा वापर केला आहे. त्या माध्यमातून 60 किमी प्रतितास टॉप स्पीड मिळतो.

– या तिन्ही इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये ऑटो हेडलाईटची सुविधा, बॅटरी लेव्हल, चार्जिंग लेव्हल, रेंज यांसारखी माहिती मिळण्यासाठी कंपनीने डिजिटल टीएफटी इंस्ट्रूमेंट पॅनेलसह एलईडी हेडलँप दिले आहेत.

– तसेच ही बाईक अवघ्या 40 मिनिटांत चार्ज होऊ शकेल.