सिंगल चार्जमध्ये 480 KM ची जबरदस्त रेंज देईल Hyundai Loniq 5; जाणून घ्या वैशिष्ट्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दक्षिण कोरियाची वाहन निर्माता Hyundai मोटार कंपनीने मंगळवारी Loniq 5 मिड-साईज क्रॉसओव्हर लाँच केली आहे. या कारमध्ये विशेष असे फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीला या कारच्या विक्रीवरून मोठी आशा आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये 480 किमीची जबरदस्त रेंज देईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

ह्युंदाई मोटारने सांगितले, की Loniq 5 कंपनीने इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. हे प्लॅटफॉर्म बॅटरी मॉड्युल टेक्नॉलॉजीचा वापर करते. ह्युंदाईच्या सध्याच्या इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत याला कमी कंपोनंट्सची गरज असते. त्यामुळे कमी भांडवलात मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाऊ शकते. Loniq 5 च्या लाँचिंगच्या माध्यमातून Hyundai चा उद्देश आहे, की 2025 पर्यंत जागतिक EV विक्रीच्या 10 टक्के हिस्सेदारी कायम राखणे आहे.

Loniq 5 ची सर्वाधिक ड्रायव्हिंग रेंज सुमारे 480 किमी (298 मैल) असेल. तर Kona EV च्या जवळपास 20 टक्क्यांवर आहे. तर यापूर्वी Hyundai ची EV लाईनअपमधून सर्वात मोठ्या रेंजची होती. या कारमध्ये दोन-स्पोक स्टिअरिंग व्हिल देण्यात आले आहे असून, उजव्या बाजूला एक फिजिकल ड्राईव्ह स्टाल्क मिळणार आहे. हे स्टिअरिंग व्हिल, ह्युंदाई आणि किआ समूहाच्या लक्झरी ब्रँड Genesis च्या कारसारखाच असेल. तसेच दोन कपहोल्डर, एक आर्मरेस्ट असेल.

दरम्यान, दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनीने Loniq 5 च्या किमतीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, ह्युंदाई मोटार युरोपचे अध्यक्ष मायकल कोल यांनी सांगितले, की युरोपात सरकारी प्रोत्साहनशिवाय या कारची किंमत सुमारे 42,000 युरोपासून सुरु असेल.