Coronavirus : इटलीमध्ये कमी झाला ‘कोरोना’ व्हायरसचा कहर, सलग चौथ्या दिवशी कमी झाली संक्रमणाची नवीन प्रकरणे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  इटलीत कोरोना व्हायरसने आपले भयानक रूप दाखवले असून पण इतक्या भयावह परिस्थिती नंतर इटलीमध्ये सलग चौथ्या दिवशी संक्रमणाची नवीन प्रकरणे कमी झालेली दिसून आली आहेत. बुधवारी सलग चौथा दिवस असा होता कि इटलीमध्ये संक्रमणाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तज्ञ सांगत आहेत की, इटलीत लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.

इटलीत कोरोनाच्या संक्रमणामुळे संपूर्ण जगाला चिंता सतावत असून अमेरिकेत इटलीप्रमाणे संक्रमण पसरत आहे, असे जाणकार सांगत आहेत. इटलीमध्ये संक्रमण रोखण्यासाठी दोन आठवडे जवळजवळ सगळ्या गोष्टी बंद केल्या गेल्या असून गर्दी जमवण्यावर बंदी घातलेली आहे. सगळ्या प्रकारचे पब्लिक कार्यक्रम रद्द केले असून इटलीची अर्थव्यवस्था सस्पेन्शन मोडवर आहे आणि अनिश्चित काळासाठी आहे.

कोरोना व्हायरसमुळे इटलीत येऊ शकते भयानक मंदी

एका वृत्तसंस्थेनुसार, इटलीत येणाऱ्या काळात भयानक मंदीचा सामना करावा लागू शकतो. पुढच्या पिढ्यांना याचा परिणाम भोगावा लागेल. पण इटली प्रशासनाला कोणत्याही किंमतीत कोरोना व्हायरसपासून सुटका हवी आहे. इटलीचे पंतप्रधान गियूसेप्पे कांटे यांनी निर्णय घेतला आहे की, कोणत्याही प्रकारे व्हायरसच्या संक्रमणाला रोखले पाहिजे. या व्हायरसमुळे ७,५०३ लोकं मारले गेले असून संक्रमितांची संख्या ७५ हजार झाली आहे. पंतप्रधान कांटे यांनी म्हटले की, आपण सर्वांनी मिळून व्हायरसच्या संक्रमणाचा सामना करण्यास योगदान दिले आहे. सरकारने शक्य ते उपाय केले आहेत.

मृत्यु दर १० टक्क्यांनी घसरला

बुधवारीही कोरोना व्हायरसमुळे मरणाऱ्यांची संख्या जास्त होती. पण ती इतकी नव्हती, जितकी मागच्या आठवड्यात शेवटच्या एका दिवसात झाले होते. इटलीच्या आरोग्य विभागाने कोरोना व्हायरसमुळे ६८३ मृत्यू नोंदवले असून संक्रमणाची ५,२१० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. इटलीत कोरोना व्हायरसमुळे मरणाऱ्यांची संख्या १० टक्के घसरल्याचे नोंद केली गेली आहे.

You might also like