पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – New Chandani Chowk flyover | पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. (New Chandani Chowk flyover)
यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम (NHAI Sanjay Kadam) , वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar), माजी नगरसेवक किरण दगडे पाटील (Kiran Dagde Patil), दीपक पोटे (Deepak Pote), अमोल बालवडकर (Amol Balwadkar), माजी नगरसेविका अल्पना वर्पे (Varpe Alpana), आदी उपस्थित होते. (New Chandani Chowk flyover)
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने श्री. पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली.
पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात उड्डाणपूल, सेवा रस्ता उभारण्यात येत असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी यावेळी पालकमंत्री पाटील यांना दिली.
पुणेकरांसाठी चांदणी चौक हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे उर्वरित काम
जलदगतीने पूर्ण करावे. त्यासोबतच कामात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घ्यावी.
पावसाची शक्यता लक्षात घेऊन, उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Web Title : New Chandani Chowk flyover | Inspection of flyover work at Chandni Chowk by Guardian Minister Chandrakant Patil
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | सिंहगड रोड परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ ! इमारतीच्या आर्थिंग वायरची चोरी करणार्या दोघांना अटक
- Maharashtra Cabinet | ‘…ही एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका’, खातेवाटपानंतर काँग्रेस नेत्याचा टोला
- Sara Ali Khan | अभिनेत्री सारा अली खानने केली मुंबईमध्ये स्ट्रीट शॉपिंग