‘मोदी जी की बेटी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटही मागे नाही. एकामागे एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या वर्षात अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. आता पुन्हा चाहत्यांच्या भेटीला एक आगळा-वेगळा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘मोदी जी की बेटी’…

‘मोदी जी की बेटी’ चित्रपटामध्ये नेमके काय दाखविले जाईल याची माहिती अद्याप समजली नाही. मात्र हा चित्रपट एक विनोदी अ‍ॅक्शनपट असेल असे समजले आहे. या चित्रपटामधून जाहिरात क्षेत्रात काम करत असणारे फिल्ममेकर एडी सिंह पदार्पण करणार आहे.

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पेरेशन ऑफ इंडिया (एनएफडीसी) चे फिल्म फेस्टिव्हल गोव्यामध्ये सुरु आहे. त्यामध्ये ‘मोदी जी की बेटी’ या चित्रपटाच्या शिर्षकाने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

या फेस्टिव्हलच्या दरम्यान केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत फिल्ममेकर एडी सिंह यांनी चर्चा केली. यावेळी सिंह म्हणाले की, ‘त्यांना चित्रपटातील काही लोकांना भेटल्यावर छान वाटले. यापैकी अनेकांसोबत मला काम करण्याची इच्छा आहे. मी माझा चित्रपट ‘मोदी जी की बेटी’ याबद्दल सर्वांना सांगू शकलो. त्यामुळे मी खूप भाग्यवान समजतो.’ या चित्रपटामध्ये कोण कोण काम करणार आहे हे अद्याप समजले नाही.

Visit : Policenama.com