‘रॅपर’ बादशाह आणि जॅकलीनच्या ‘गेंदा फूल’ गाण्यावरून नवा ‘वाद’ ! होतोय ‘हा’ आरोप

पोलीसनामा ऑनलाईन : प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर बादशाह आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांनी मिळून अलीकडेच एक गाणं केलं होतं. गेंदा फूल असं या गाण्याचं नाव आहे. बादशाहचं हे बंगाली पंजाबी फ्युजन युट्युबवर ट्रेंड करताना दिसत आहे. गाण्याला चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. या गाण्यानं आता एका नव्या वादाला तोंड फुटल्याचं दिसत आहे.

बादशाहच्या गेंदा फूल या नव्या गाण्यावर आता चोरीचा आरोप करण्यता आला आहे. या गाण्यातील काही बांग्ला बोल ओरिजिनल फोक साँग बौडोलोकेर बेटीलोसोबत मिळत आहेत. बंगाली फोक साँगच्या ओरिजनल रायटरनं मेकर्सवर लिरिक्सचे क्रेडिट देण्याचा आरोप केला आहे. हे सरळ सरळ कॉपीराईट अॅक्टचं उल्लंघन केल्याचं प्रकरण आहे. या प्रकरणी आता वाद होताना दिसत आहे. काहींनी तर बादशाहच्या या गाण्याला विरोधही केला आहे.

या बांग्ला गाण्याला रतन कहरनं लिहलं आहे. ज्याचा आरोप आहे की, बादशाहनं त्याला या गाण्यासाठी क्रेडिट दिलेलं नाही. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांना लेटर लिहून याबाबत तक्रार करण्यात आली आहे. आता या सगळ्यावर बादशाहची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.