फ्रान्समध्ये मिळाला कोरोनाचा नवा स्ट्रेन, २४ तासात चार हजारांपेक्षा अधिक संक्रमित

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाने पुन्हा एकदा खळबळ उडवण्यास सुरवात केली आहे. फ्रान्समध्ये सोमवारी कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी उशिरा एक निवेदन पाठवून सांगितले आहे की, कोरोना विषाणूंचा नवीन स्ट्रेन सापडला आहे. सुरवातीच्या विश्लेषणानुसार असे दिसून आले आहे की हा नवीन वाढलेला स्ट्रेन इतरांपेक्षा गंभीर आणि संक्रमण पसरवणारा नाही. लॅनयन येथील रुग्णालयात नवीन स्ट्रेन सापडल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

फ्रान्स आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना विषाणूच्या आयसीयूमधील लोकांची संख्या गेल्या २४ तासांत ९२ वरून ४,२१९ वर गेली आहे. नोव्हेंबर २०२० नंतर अशा रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे.

रविवारी १४० लोकांच्या तुलनेत आरोग्य मंत्रालयाच्या जिओडसी वेबसाइटमध्ये रुग्णालयात ३३३ कोरोना विषाणू असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ९०,७६२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या आठवड्याच्या शेवटी, पॅरिस परिसरातील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये कोविड रुग्णसंख्या आधीपेक्षा चार पट जास्त झाली आहे. राजधानीच्या आरोग्य यंत्रणेवरील दबाव कमी करण्यासाठी, रुग्णांना फ्रान्सच्या इतर भागांमध्ये स्थानांतरित केले जात आहे.

सोमवारी आरोग्य मंत्रालयानेही ६४७१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद केली आहे. जी मागील सोमवारच्या तुलनेत ३.३ टक्क्यांनी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी फ्रान्स सरकार लसीकरणाला वेग देत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनावर १८५०० लोकांना लस देण्यात आली आहे. तेथील आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे की कमीत कमी एक लस घेणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. फ्रान्सच्या ५.३ दशलक्ष प्रौढ लोकसंखेच्या १०.१ % लोकांना लस देण्यात आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी असेही म्हंटले की पश्चिम फ्रान्सच्या ब्रिटनमध्ये मिळालेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेननंतर देखरेखीत वाढ करण्यात आली आहे.