भारतात सापडला कोरोना व्हायरसचा आणखी एक ‘खतरनाक’ व्हेरिएंट, 7 दिवसात कमी करतो वजन – रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरस सतत आपले रूप बदलून आणखी धोकादायक होत चालला आहे. सातत्याने याचे नवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. आता याचा आणखी धोकादायक व्हेरिएंट (variant) सापडला आहे. हा इतका धोकादायक आहे की, यामुळे संक्रमित झाल्याने सात दिवसांच्या आत रूग्णाचे वजन कमी होते. अगोदर हा व्हेरिएंट ब्राझीलमध्ये सापडला होता. तेथून याचा एकच व्हेरिएंट variant भारतात आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, आता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ब्राझीलहून कोरोनाचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. दुसर्‍या व्हेरिएंटचे नाव बी.1.1.28.2 आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांनी या व्हेरिएंटची variant चाचणी एका उंदरावर केली. याचे परिणाम आश्चर्यकारक होते. शास्त्रज्ञांना आढळले आहे, संक्रमित झाल्यानंतर ताबडतोब सात दिवसांच्या आतच याचे निदान केले जाऊ शकते. हा इतका धोकादायक आहे की, शरीराचे वजन 7 दिवसांच्या आत कमी करू शकतो. यासोबत डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे हा सुद्धा अँटीबॉडी क्षमता कमी करू शकतो.

पुण्याच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही) च्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, बी.1.1.28.2 व्हेरिएंट variant परदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये सापडला होता. या व्हेरिएंटचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आणि नंतर चाचणी करण्यात आली. सध्या भारतात याची खुप जास्त प्रकरणे नाहीत, परंतु डेल्टा व्हेरिएंट सर्वात जास्त मिळत आहे.

परदेशातून परतलेल्या दोन लोकांच्या सॅम्पलचे सिक्वेन्सिंग करण्यात आले होते. कोरोनातून रिकव्हरी झाल्यानंतर दोन लोकांमध्ये त्याची लक्षणे नव्हती, परंतु याच्या सॅम्पलच्या सिक्वेन्सिंगनंतर जेव्हा बी.1.1.28.2 व्हेरिएंटचा variant शोध लागला तेव्हा त्याची नऊ सिरियाई हॅमस्टर उंदराच्या प्रजातीवर सात दिवस चाचणी करण्यात आली. यापैकी तीन उंदरांचा मृत्यू शरीराच्या आतील भागात संसर्ग वाढल्याने झाला.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी रिकाम्यापोटी प्या ‘हा’ स्पेशल ज्यूस; जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today : एक दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या आजचे भाव