नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला पदभार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पुणे शहर पोलीस दलात दाखल होत आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. मावळते पोलीस डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नवनियुक्त आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रविवारी पदभार स्वीकारत पूर्वी प्रमाणेच सुट्टी दिवशी देखील काम सुरू राहील असा संदेश यामधून पोलीस दलाला दिला आहे. दरम्यान नव्या आयुक्तांपुढे “स्ट्रिक क्राईम” अर्थातच चोऱ्या, लूटमार, वाहन चोरी आणि घरफोड्या अश्या गुन्ह्यांना रोखण्याचे आवाहन असणार आहे. गेल्या काही वर्षात या घटना थांबता थांबत नसल्याचे दिसत आहे. तर यासोबतच पुणेकरांचा विश्वास संपादन करत काम करावे लागणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like