लवकरच चलनात येणार 550 रुपयांचं नवीन नाणं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – श्री गुरु नानक देव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाची जय्यत तयारी सुरु आहे. श्री गुरु नानक देव यांच्या जयंती पर्वानिमित्त केंद्र सरकारकडून 550 रुपयांचं नवीन नाणं जारी करण्यात येणार असल्याची माहिती शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे प्रमुख भाई गोविंदसिंग यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शीख समुदायाकडून सरकारचे कौतूक करण्यात येत आहे.

केंद्र सरकारला 550 रुपयांच्या नवीन नाण्याच्या डिझाईनसाठी संत शिरोमणी कमेटीने मंजूरी दिली आहे. श्री बेर साहेब सुल्तानपुर लोधी येथे 12 नोव्हेंबर रोजी गुरु नानक यांच्या 550 व्या जयंती मोहत्सवामध्ये केंद्र सरकार या नवीन नाण्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती गोविंदसिंग यांनी दिली आहे. या कार्यक्रमला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि पंजाब सरकारचे मंत्रीमंडळातील मंत्री उपस्थित राहणार आहेत.

असे असेल नवीन 550 रुपयांचे नाणे
श्री गुरु नानक देव यांच्या जयंती पर्वानिमित्त केंद्र सरकारकडून 550 रुपयांचं नवीन नाण्यावर प्रथम गुरुद्वारा श्री बेर सुल्तानपूर लोधी यांचा फोटो लावण्याचे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने सुचवले आहे. मात्र, केंद्र सरकारने या नाण्यावरील एका बाजुला गुरुनानक देवजी यांचे जन्मस्थान नानकाना साहिब गुरुद्वाराचा फोटो छापण्याचे ठरवले आहे. हे नाणे बनवण्यासाठी 50 टक्के लोखंड आणि 40 टक्के तांब्याचा वापर करण्यात येणार आहे. हे नाणे आकाराने 10 रुपयांच्या नाण्यापेक्षा मोठे असेल.

You might also like