New Debit-Credit Card Rules | 1 जानेवारीपासून लागू होतील क्रेडिट-डेबिट कार्डचे नवीन नियम, तुम्हाला कसे करतील प्रभावित, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – New Debit-Credit Card Rules | ऑनलाइन कार्ड पेमेंटचे नियम बदलतील. डेबिट आणि क्रेडिट कार्डची सुरक्षा पाहता हा बदल केला जात आहे (New Debit-Credit Card Rules). रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) हे नियम लागू करणार आहे. आरबीआयने ऑनलाइन सुरक्षीत पेमेंटसाठी सर्व वेबसाइट आणि पेमेंट गेटवे (payment gateways) द्वारे स्टोअर करण्यात आलेला ग्राहकांचा डेटा हटवणे आणि तिथे व्यवहारासाठी एन्क्रिप्टेड टोकन (encrypted tokens) चा वापर करण्यास सांगितले आहे.

 

स्टोअर होणार नाहीत कार्डच्या डिटेल
नवीन नियमानुसार, ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंटदरम्यान आता मर्चंट वेबसाइट किंवा अ‍ॅपमध्ये तुमच्या कार्डच्या डिटेल स्टोअर करू शकणार नाहीत. ज्या मर्चंट वेबसाइट किंवा अ‍ॅपवर तुमच्या कार्डच्या डिटेल स्टोअर आहेत, त्या डिलिट होतील.

 

याचा परिणाम म्हणजे नवीन वर्षापासून डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन शॉपिंग करताना किंवा एखाद्या पेमेंट अ‍ॅपवर डिजिटल पेमंटसाठी वापरले तर कार्डचा तपशील स्टोअर होणार नाही.

 

काय सांगतो नवीन नियम (New Debit-Credit Card Rules)
1 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन पेमेंट करताना, तुम्हाला एकतर 16 अंकी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांकासह संपूर्ण कार्ड तपशील प्रविष्ट करावा लागेल किंवा ’एनक्रिप्टेड टोकन्स’ चा पर्याय निवडावा लागेल. सध्या कार्ड नंबर पेमेंट अ‍ॅप किंवा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर संग्रहित आहेत. फक्त CVV आणि OTP टाकून पेमेंट करू शकता.

 

आरबीआयची गाईडलाईन (What did RBI say)
आरबीआयने मार्च 2020 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती की, डेटा सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापार्‍यांना त्यांच्या वेबसाइटवर कार्डची माहिती संग्रहित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आरबीआयने सप्टेंबर 2021 मध्ये या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि कंपन्यांना वर्षाच्या अखेरीस नियमांचे पालन करण्यास सांगितले आणि त्यांना टोकनायझेशनचा पर्याय दिला.

आरबीआयने 1 जानेवारी 2022 पासून सर्व कंपन्यांना त्यांच्या सिस्टममधून सेव्ह केलेला क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा हटवण्याचे आदेश दिले आहेत.

 

बँका करत आहेत अलर्ट (Bank Alert)
काही बँकांनी तर आपल्या ग्राहकांना नवीन नियमांबाबत अलर्ट करण्यास सुरूवात केली आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना म्हटले आहे की, चांगल्या कार्ड सुरक्षेसाठी आरबीआयच्या नवीन मॅनडेटनुसार मर्चंट वेबसाइट/अ‍ॅपवर सेव्ह तुमच्या एचडीएफसी बँक कार्ड (HDFC Bank card) च्या डिटेल्स 1 जानेवारी, 2022 पासून मर्चटद्वारे डिलिट केल्या जातील. प्रत्येकवेळी पेमेंटसाठी ग्राहकाला कार्डच्या पूर्ण डिटेल्स टाकाव्या लागतील किंवा टोकनायजेशन सिस्टम अवलंबावी लागेल.

 

काय आहे टोकनायजेशन (What is tokenisation)
टोकनायझेशनच्या मदतीने, कार्डधारकाला त्याच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे सर्व तपशील शेअर करण्याची गरज नाही. टोकनायझेशन म्हणजे मूळ कार्ड क्रमांक वैकल्पिक कोडद्वारे बदलणे. या कोडलाच टोकन म्हणतात.

 

टोकनायझेशन प्रत्येक कार्ड, टोकन विनंतीकर्ता आणि व्यापारी यांच्यासाठी अद्वितीय असेल.
टोकन तयार झाल्यानंतर, टोकनयुक्त कार्ड तपशील मूळ कार्ड क्रमांकाच्या जागी वापरला जाऊ शकतो.
ऑनलाइन पेमेंटसाठी ही प्रणाली अधिक सुरक्षित मानली जात असल्याचे बोलले जात आहे.

 

काय आहे सध्याचा नियम
जेव्हा तुम्ही तुमचे कार्ड, डेबिट किंवा क्रेडिट व्यवहारासाठी वापरता, तेव्हा तुम्हाला कार्ड चे 16 नंबर,
कार्ड एक्सपायरी डेट, CVV तसेच वन-टाइम पासवर्ड किंवा ट्रान्झॅक्शन पिन यासारखी माहिती वापरणे आवश्यक आहे.
कोणताही व्यवहार तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा या सर्व गोष्टी योग्यरित्या प्रविष्ट केल्या जातात.

एक जानेवारीला करावे लागेल हे काम
1 जानेवारीपासून, मर्चंटला पेमेंट करताना प्रमाणीकरणासाठी (AFA) स्वतंत्र संमती देणे आवश्यक आहे.
एकदा संमती नोंदणीकृत झाल्यानंतर, कार्डचा CVV आणि OTP टाकून पेमेंट पूर्ण करावे लागेल.

 

कार्ड तपशील एनक्रिप्टेड पद्धतीने नोंदवला जातो, तेव्हा डेटाची फसवणूक किंवा छेडछाड होण्याचा धोका कमी होतो.

 

Web Title :- New Debit-Credit Card Rules | credit card debit card new rule for online payments from 1 january 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Indian Railways | रेल्वेचा मोठा निर्णय ! आता ट्रेनमध्ये महिलांना सीट मिळण्यात येणार नाही अडचण, मिळेल ‘रिझर्व्ह बर्थ’

MoRTH | आता कमी होईल अपघाताचा धोका ! रोड सेफ्टी फीचर्ससह रस्ते मंत्रालयाने लाँच केले नवीन नेव्हीगेशन अ‍ॅप

Pankaja Munde | 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना खडा सवाल