दिल्लीमध्ये ‘लॉकडाऊन’ दरम्यान पोलिसांवर मोठा आतंकवादी हल्लाचा कट रचतोय ISIS

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – देशातील जनता कोरोना विषाणूमुळे मोठ्या संकटात सापडली आहे, याच दरम्यान एक बातमी समोर आली आहे की, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया राजधानी दिल्लीमध्ये हल्ला करू शकते. दिल्ली पोलिसांच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआयएसचे (ISIS) गट दिल्लीत लॉकडाऊनमुळे ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करण्याचा कट रचत आहेत.

दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन दरम्यान आयएसआयएस ही दहशतवादी संघटना ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना निशाणा बनवू शकते. या सुचना समोर आल्यानंतर पोलिस उपायुक्त, विशेष सेल यांनी परिस्थिती लक्षात घेता फिल्ड स्टाफला लवकरच माहिती दिली जाऊ शकते, असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर 25 मार्च रोजी रात्री 12 वाजल्यापासून दिल्लीसह संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे. त्याअंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी दिल्लीत पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.

लॉकडाऊननंतर उत्तर प्रदेश आणि हरियाणाला लागून असलेले दिल्ली बॉर्डर पोलिसांनी सील केले आहे. केवळ तपासणी केल्यानंतरच अत्यंत महत्त्वाच्या कामावर किंवा ड्यूटीवर असलेल्या लोकांनाच ये-जा करण्याची परवानगी दिली आहे. यासह पोलिस अशा लोकांना मदत करीत आहेत, जे खूप गरीब आहेत. बर्‍याच ठिकाणी पोलिस अन्न वाटप करत आहेत.

त्याचबरोबर दिल्लीसह देशाच्या इतर राज्यांतही कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याच्या बातम्या समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशभरात एकूण 1397 प्रकरणे समोर आले आहेत, तर त्यापैकी 166 नवीन प्रकरणे होते. त्याच वेळी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, आतापर्यंत कोविड -19 मुळे 35 लोकांचा मृत्यू झाला आहे, 123 लोक पूर्णपणे बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत.