Coronavirus : जास्तीच्या हसण्यानं देखील ‘फोफावू’ शकतो ‘कोरोना’, AIIMS-ICMR नं सांगितली ‘मार्गदर्शक तत्वे’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे जगभरात आत्तापर्यंत 19,000 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. याचा वाढता कहर लक्षात घेता, त्याच्या प्रसाराच्या सर्व कारणांवर सातत्याने संशोधन होत आहे. या अनुक्रमात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) यांनी संयुक्तपणे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात म्हटले आहे की, संक्रमित व्यक्तीच्या जोरात हास्याने कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका देखील आहे.

यामुळेच हसण्याने पसरतो व्हायरस
या भागात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, जोर-जोरात हसण्यामुळे देखील कोरोना व्हायरस लोकांना घेरू शकतो. खरं तर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्लीच्या डॉक्टरांसह एकत्रित कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत, ज्यात ते म्हणाले की, संक्रमित व्यक्तीच्या मोठ्याने हसण्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका देखील असू शकतो. चीनी तज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, मानवाच्या मळामध्ये कोरोना व्हायरस अनेक आठवडे जिवंत राहू शकतो. या संशोधनाच्या परिणामाला बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केले आहेत.

शिंकल्यावर आपल्या चेहऱ्याला स्पर्श करु नका
एम्सच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. अंबुज रॉय यांनी म्हटले आहे की, खोकला आणि शिंका येण्यादरम्यान कोरोना व्हायरस थेंबांमधून बाहेर पडतो, म्हणून हाताला तोंडाला स्पर्श करू नका. तसेच, जेव्हा संक्रमित व्यक्ती मोठ्याने हसल्यावर देखील व्हायरस बाहेर येतो.

घराची साफसफाई करणे महत्वाचे आहे
एखादी व्यक्ती शिंकते किंवा खोकते तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडतात आणि ते कित्येक तास सक्रिय राहतात, अशामध्ये कोणताही व्यक्ती त्याच्याशी संपर्क साधतो तेव्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका असतो. या प्रकरणात, घराची फर्शी, टेबल इत्यादी क्लिनर किंवा साबणाने धुवा.

पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हात धुवा
सर्व प्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की, कोरोना व्हायरस एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पोहचतो. अशा परिस्थितीत आपण जर आपण चुकून पृष्ठभागास स्पर्श केल्यास हात धुवा किंवा स्वच्छ करा.

तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून टाळायचे असेल तर अल्कोहोल आणि धूम्रपान करणे त्वरित थांबवा, कारण या दोन्ही सेवनाने कोणत्याही व्यक्तीची आजारांविरुद्ध लढण्याची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत जेव्हा कोराना व्हायरसची लागण होते तेव्हा त्याला दुहेरी समस्येचा सामना करावा लागतो.

रक्तदाबाचे रुग्णांनी मीठाचे सेवन कमी करावे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोराना व्हायरसचा धोका लक्षात घेता लोकांनी विशेषतः उच्च रक्तदाब रुग्णांनी मीठ कमी खाणे गरजेचे आहे.

प्रतिबंधात्मक उपाय
1. जीवन शैलीचा स्तर उंच ठेवा
2. मॉर्निंग वॉक सकाळी करु शकता
3. टेरेवर चालू शकता
4. जर खूपच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा आणि महत्वाचे म्हणजे बाहेर पडताना मास्क वापरा
5. जर आपल्याला ताप, खोकला आणि डोकेदुखी असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
6. ताप आणि खोकला एकत्र असल्यास, तत्काळ स्वत: ला घरातील इतर सदस्यांपासून दूर ठेवा.

दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राजधानी दिल्लीत आतापर्यंत 35 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यापैकी 28 रुग्णांवर चार वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये 13, लोकनायकमधील सहा, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सहा आणि जीटीबी हॉस्पिटलमधील दोन रूग्ण आहेत. दुसरीकडे, दिल्ली सरकारने लॉकडाऊनचे पूर्ण पालन करण्यासाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्याविषयी बोलले आहे.