होळीच्या एक दिवसापुर्वी दिल्लीत ‘डबल मर्डर’, माय-लेकीची हत्या, फ्लॅटमध्ये आढळले दोघींचे मृतदेह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व दिल्लीत एका प्रतिष्ठीत परिसर वसुंधरामध्ये आई आणि मुलीच्या हत्येने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार वसुंधरा एन्क्लेव्हमध्ये आई आणि मुलीची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी दोघींचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मृतांची ओळख सुमिता (आई) आणि स्मृता (मुलगी) अशी झाली आहे.

सकाळी झाला दुहेरी हत्येचा खुलासा –
सांगण्यात येते की पतीच्या मृत्यूनंतर आई सुमिता आणि मुलगी स्मृता वसुंधरा एन्क्लेव्हमध्ये मानसारा अपार्टमेंटमध्ये राहत होते. सोमवारी सकाळी घरकाम करणारी महिला घरी पोहोचली तेव्हा आई आणि मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलिसांनी दोघींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी तपास सुरु केला असून शवविच्छेदनानंतर दोघींची हत्या झालीये की नाही हे स्पष्ट होईल.

प्राथमिक तपासात कळाले की सुमिता इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती, तर मुलगी हॉस्पिटॅलिटी सेक्टरचे प्रशिक्षण घेत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचे निशाण आहेत. प्राथमिक तपासावरुन संशय आहे की हत्येत एक पेक्षा अधिक लोकांचा समावेश होता.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. सोसायटीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरु आहे. पोलिसांच्या सूत्रानुसार हत्या एखाद्या ओळखीतल्या व्यक्तीने केलेली असू शकते. पोलीस तपासासाठी आई आणि मुलीचे कॉल डिटेल जमा करत आहेत. ज्यामुळे कळेल की हत्येपूर्वी त्यांचे कोणाशी बोलणे झाले होते. होळीच्या एक दिवसाआधी झालेल्या या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.