Coronavirus : ‘लोकपाल’चे एक सदस्य ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, AIIMS मध्ये उपचारासाठी दाखल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – लोकपालचे एक सदस्य (जस्टिस) देखील कोरोनाच्या विळख्यात आले आहे, मिळालेल्या माहितीनुसार त्यांना दिल्लीतील अखिल भारतील आयुर्विज्ञान संस्थेच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. देशातील कदाचित हे पहिले कोरोनाचे प्रकरण असेल ज्यात एखाद्या माजी न्यायाधीशांना आणि इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीला कोरोना झाला आहे. खबरदारी म्हणून त्यांच्या कुटूंबीयांना देखील क्वारंटाइन होण्यासाठी सांगण्यात येईल. शक्यता आहे की या सर्वांची चाचणी करण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करण्यात येईल.

दिल्लीत डझनभर डॉक्टर आणि नर्स स्टाफला कोरोना झाला आहे, एका डॉक्टरांवर AIIMS ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. एम्सचे ट्रामा सेंटरमध्ये कोविड – 19 वर उपचार करण्यात येत आहे. हे रुग्णालय कोरोनांच्या रुग्णांसाठी विशेषकृत करण्यात आले आहे.

याआधी दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात एकूण 108 लोकांना क्वारंटाइन केले आहे. ज्यात डॉक्टर आणि नर्स कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, या 108 लोकांंपैकी 23 जणांना रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले तर 85 जणांना होम क्वारंटाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातील डॉक्टर, नर्स 2 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आले होते.

तबलिगी मरकजमध्ये दिल्लीत लोक सहभागी झाल्यामुळे दिल्लीत कोरोना पॉझिटिव्हची प्रकरणं वाढली आहेत. दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 386 वर पोहोचला आहे, तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 लोक बरे झाले आहेत, सांगण्यात येत आहे तबलिगी जमातचे जसे जसे रिपोर्ट येतील तशी तशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होईल.

दिल्लीतील आकडेवारीनुसार एकूण कोरोनाची प्रकरण 386 आहेत. तर रुग्णालयात 369 लोक दाखल झाले आहेत तर 10 लोकांना उपचारानंतर सोडण्यात आले, तर मृतांचा आकडा 6 वर पोहोचला आहे.