निर्भया केस : फाशीच्या ‘दहशती’नं चारही दोषी भीतीच्या सावटाखाली, सर्वाधिक विनय घाबरलेला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणात डेथ वॉरंट जारी केल्यानंतर तिहार कारागृहातील चार दोषी (अक्षयसिंग ठाकूर, मुकेश सिंह, पवन कुमार गुप्ता आणि विनय कुमार शर्मा) गंभीर अवस्थेत आहेत. त्याच्या चेहर्‍याचे भाव बदलले आहेत. चारही आरोपींनी धास्ती घेतली असून प्रत्येकाने मौन बाळगले आहे. डेथ वॉरंट जारी केल्यांनतर तिहार जेल प्रशासनही सक्रिय झाले आहे. तिहार कारागृह अधिकाऱ्यांनी चार दोषींची सुरक्षा वाढविली आहे, तर त्यांच्या देखरेखीसाठी सीसीटीव्हीचा वापर केला जात आहे. दरम्यान, डेथ वॉरंटनंतर विनय कुमार शर्माला सर्वाधिक धक्का बसला आहे. तो बर्‍याचदा आपल्या जेलच्या कक्षात फिरताना दिसतो. याआधीही, पहिल्या डेथ वॉरंटनंतर विनयने तुरूंगातील अधिकाऱ्यांना फाशी देण्याबाबत चौकशी केली होती.

सतत समुपदेशन :
3 मार्च रोजी फाशीची तारीख असल्याने तिहार जेल मनोरुग्ण तज्ज्ञांकडून चार दोषींना समुपदेशन करीत आहे. चौघांसोबत सतत चर्चा केली जात आहे. तिहार तुरूंग प्रशासन घाबरले आहे की, कदाचित निराश होऊन त्यांनी चुकीचे पाऊल उचलू नये. कारण, तिहार तुरूंगात 2013 मध्ये आरोपी रामसिंगने आत्महत्या केली होती. त्यानंतर तिहारच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

तिहार तुरूंग प्रशासन फाशीच्या कार्यवाहीत व्यस्त
सोमवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी केल्यानंतर तिहारमध्ये फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यास, चौघांना टांगण्यासाठी फक्त 13 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत अखेर सर्व दोषींना पुन्हा एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. याबाबत, लवकरच तिहार जेल प्रशासन सर्व दोषींच्या कुटुंबांना, विशेषत: पालकांना पत्र पाठवून अंतिम बैठक घेण्यास सांगेल.

अधिकाऱ्यांकडून फाशी घराची पाहणी :
मंगळवारी नवीन डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर तिहार कारागृह अधिकाऱ्यांनी पुन्हा फाशी देण्याच्या घराची पाहणी केली. माहिती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी आपला अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे. फाशी देण्याच्या प्रक्रियेच्या प्रकरणात, एक किंवा दोन दिवसांत, कुटुंबातील सदस्यांना दोषींसह शेवटच्या भेटीची तारीख सांगितली जाईल. जेल अधिकारी याबाबत आरोपींशी बोलत आहेत. त्यांनी सांगितलेल्या दिवसानुसार तारीख ठरविली जाईल.

दरम्यान, १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीच्या वसंत विहार भागात चालत्या बसमध्ये निर्भयावर (राम सिंह, एक अल्पवयीन, पवन, विनय, मुकेश आणि अक्षय) चौघांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली, ज्यांनंतर केंद्र सरकारने कायद्यात मोठा बदल घडवून आणला. यासह फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालला, त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली .

You might also like