ओवेसींच्या ‘त्या’ प्रक्षोभक भाषणांचा तपास करा : न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MIM चे प्रमुख खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी २०१४ मध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणांबद्दल तपास करण्याचे आदेश दिल्लीतील कडकडडुमा न्यायालयाने दिले आहेत. ओवेसींच्या भाषणांबद्दल दिल्ली पोलिसांनी तपास थांबविण्यात आल्याचे जाहीर केल्यानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे आदेश दिले. सामाजिक कार्यकर्ते अजय गौतम यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण दिल्याचे वार्तांकन एका ऑनलाईन लेखात वाचल्यानंतर अजय गौतम यांनी असदुद्दिन ओवैसी यांच्याविरोधात हैदराबादमध्ये पोलिस तक्रार दाखल केली. असदुद्दिन ओवैसी यांनी एका समुदायाच्या मनात द्वेष पसरविण्याचा केलेला प्रकार हा पहिलाच नसून, याआधीही त्यांनी असे कृत्य केले असल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे अजय गौतम यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांनी या प्रकरणी पुन्हा तक्रार दाखल केली. धर्म आणि विखारी भाषा वापरून दोन किंवा अधिक समुदायांमध्ये द्वेष भावना निर्माण होईल असे कृत्य करणे, त्यासाठी कट रचणे, असे आरोप त्यांनी असदुद्दिन ओवैसींवर ठेवले आहेत. आता या प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काय आहेत ती वादग्रस्त वक्तव्ये

१)तीन तलाक वर ओवेसीने मोदी सरकार वर हल्ला चढवत म्हंटले होते की, ‘खरेतर त्यांचा नारा निशाणा शरियत आहे’.

२)देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील धार्मिक तीर्थयात्रा आणि त्यावर हजारो करोडो रुपये खर्च केले जातात. पण सुप्रीम कोर्टाकडून २०२२ पर्यंत हज सबसिडी बंद होणारच होती. असे विधान ओवेसी यांनी केले होते.

३)ताजमहाल च्या बाहेर उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर साफसफाई केली होती. त्यावरून ओवेसींनी ‘भाजप – आरएसएस नेत्यांचा मेंदू साफ करण्याची गरज आहे’ असे वक्तव्य केले होते.

४) लातूर मधील उदगीर इथल्या सभेत बोलताना मोठे वादग्रस्त विधान ओवेसींनी केले होते. संविधानात असे कुठेच लिहले नाही की ‘भारत माता की जय’ म्हणायलाच पाहिजे मी ही घोषणा नाही देत ‘ असे ओवेसी म्हणाले होते.