Delhi Violence : निलंबीत APP नगरसेवक ताहिर हुसेन अटकेत, हिंसाचार भडवण्यासह IB कॉन्स्टेबल अंकित शर्माच्या हत्येचा आरोप

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील आरोपी आम आदमी पार्टीचा निलंबित माजी नगरसेवक ताहिर हुसैन याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताहिर हुसैनवर आयबी कॉंस्टेबल अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोप आहे. यासह दिल्लीत हिंसा भडकवणे, कट रचणे यासारखे अन्य गुन्हे दाखल आहेत.

याआधी अतिरिक्त मुख्य मेटोपॉलिटन मजिस्ट्रेट विशाल पाहूजा यांनी ताहीर हुसैनच्या आत्मसमर्पणाचा अर्ज फेटाळला होता. यावर न्यायालयाने तर्क लावला होता की हे त्यांच्या अखत्यारित येत नाही.

दिल्ली हिंसाचाराचा आरोपी ताहिर हुसैनविरूद्ध दिल्ली गुन्हे शाखेने तपास अधिक तीव्र केला होते. त्याचे कॉल डिटेल तपासल्यानंतर पोलिसांना बरेच पुरावे सापडले होते. त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस बजावण्याची तयारी करण्यात आली होती. कॉल तपशीलानुसार हिंसाचाराच्या दिवशी 24 फेब्रुवारी रोजी ताहिर हुसेन यांनी 150 कॉल केले होते. त्यावेळी ताहिर चांदबागच्या त्याच घरात उपस्थित होता. ताहिर त्या दिवशी कोणाशी बोलला या तपासात पोलिस गुंतले होते.

ताहिर हुसैनच्या घरावरुन केली गेली दगडफेक :
माहितीनुसार, आपचा माजी नगरसेवक ताहिर हुसेन याने आपल्या समर्थकांना आणि स्थानिकांना दगडफेक करण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये ताहिर हुसैनचे समर्थक त्याच्या घराच्या छतावरुन दगडफेक करताना दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये असेही दिसून येत आहे की, विरोधकांना रोखण्याऐवजी ताहिर इकडे-तिकडे फिरत आहेत. तसेच ताहिरच्या घराशेजारील एका घरावर हल्ला करण्यात आला असून ट्रोल बॉम्बने ते पेटवून दिले. त्यानंतर स्थानिकांनी ताहिरच्या घराच्या आत दगडफेक करणाऱ्यावर हल्ला केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ताहिरने स्पष्टीकरण देताना स्वत: ला पीडित म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वत:ला पोलिसांनी वाचवले असे सांगत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.