‘जीवनदान’ देणार्‍या डॉक्टरकडूनच ‘खुनी’ खेळ ; पत्नी, मुला-मुलीची हत्या करून आत्महत्या

गुरुग्राम : वृत्तसंस्था – सेक्टर – ४९ मधील उप्पल साऊथ एंड एस ब्लॉक फ्लॅट नंबर २९९ तळमजल्या मध्ये राहणारे डॉक्टर प्रकाश सिंह (वय ५५) यांनी आपल्या बायको, मुलगा, मुलगी यांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादयक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मूळचे युपीतील वाराणसी येथे राहणारे प्रकाश सिंह गेले ८ वर्ष गुरुग्राम येथील सेक्टर-४९ येथे राहत होते. त्यांची पत्नी सोनू सिंह यांचे ४ प्ले स्कूल होते. स्वतः प्रकाश सिंह हे एका फार्मसी कंपनीशी संलग्न होते. गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रकाश सिंह यांनी एक सुसाइड नोट लिहिली आहे, ज्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, “मी माझ्या परिवाराला सांभाळू शकत नव्हतो म्हणून हा निर्णय घेतला”.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. कारण प्रकाश सिंह यांचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या मजबूत होते. आर्थिक परिस्थिती चांगली असूनही असे पाऊल का उचलले असेल ? हा मोठा प्रश्न लोकांसमोर उभा आहे.

बायको सोनू सिंह यांच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. आणि मुले ही खूप शांत होती. मुलगा आदित्य सेक्टर ४९ मधील डीएवी शाळेत शिकत होता तर मुलगी दिल्लीतील जामिया मध्ये शिकत होती. या घटने नंतर जवळ जवळ ३५ लोकांच्या कामावर संकट आले आहे.

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी

पारधी समाजाच्या महिलेचा विनयभंग करून मिरच्या चोरीच्या आरोपावरून मारहाण

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर

‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’