‘कोरोना’च्या औषधाबद्दल IIT दिल्लीनं दिली खुशखबर ! अश्वगंधापासून ‘कोरोना’चा उपचार शक्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग कोरोना महामारीने त्रस्त असताना आता भारतात त्याच्या औषधाबद्दल एक खुशखबर आहे. आयआयटी दिल्लीने ही खुशखबर दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), दिल्लीच्या बायोकेमिकल इंजिनियरचे प्रो. डी. सुंदर यांनी जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडवान्सड इंडस्ट्रियल सायन्स अँड टेक्नॉलॉजीसह मिळून संशोधन केले आहे की, नैसर्गिक औषधी अश्वगंधापासून कोविड-१९ चा उपचार होऊ शकतो.

अश्वगंधाकडून का आहे आशा?
अश्वगंधाचा एक रासायनिक पदार्थ कोविड-१९ ला पेशींमध्ये विकसित होण्यास रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. हे कशाप्रकारे कोविड-१९ ला विकसित होण्यास रोखू शकते, याची रूपरेखा तयार केली गेली आहे.

१५ वर्षांपासून अश्वगंधावर जपानमध्ये काम करत आहेत
प्रो. डी. सुंदर १५ वर्षांपासून अश्वगंधावर जपानच्या इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, आमच्या या शोध पत्राचा पहिला अहवाल आंतरराष्ट्रीय शोध पत्रिका जर्नल ऑफ बायोमॉलिक्युलर डायनॅमिक्समध्ये प्रकाशित करण्यास मान्यता मिळाली आहे.

अश्वगंधापासून कोविड-१९ चे औषध तयार करण्याच्या दिशेने होणार काम
दोन दिवसांत ते प्रकाशित होईल अशी अपेक्षा आहे. या संशोधनात पुढे अश्वगंधापासून कोविड-१९ चे औषध तयार करण्याचे काम आम्ही करू. ते म्हणाले की, अश्वगंधापासून कोविड-१९ चे औषध तयार करण्यासाठी काही क्लिनिकल ट्रायल्स करणे आवश्यक आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळेत याचे ट्रायल केले पाहिजेत. यावरही आम्ही काम करू.

अश्वगंधाचा वापर आयुर्वेदिक उपचारासाठी होतो
भारतात पारंपरिक स्वरूपात अश्वगंधाचा वापर आयुर्वेदिक उपचारासाठी केला जातो. त्यांनी सांगितले कि, एक महिन्यापूर्वी केंद्र सरकारने आयुष मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांना जोडणारी एक टास्क फोर्स तयार केली होती. यात त्यांना म्हटले गेले होते की, अश्वगंधा, यष्टीमधू, गुडुची यांच्यासह पिपाळी, आयुष-६४ (मलेरियाचे औषध) यासारख्या आयुर्वेद औषधांवर कोविड-१९ संदर्भात संशोधन करा.

अनेक संशोधक वापरू शकतात
प्रो. डी. सुंदर म्हणाले की, आमच्याकडून स्वतंत्रपणे अश्वगंधावर संशोधन केले गेले आहे. इतर अनेक संशोधक कोविड-१९ बाबत आमच्या संशोधनाचा वापर करू शकतात.