Video : पहिल्याच पत्रकार परिषदेत सपना चौधरीचा हरियाणवी ‘अवतार’ ; म्हणाली, ‘मुख्यमंत्री केजरीवाल पसंत नाहीत’

दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणवी डान्सर सपना चौधरीने रविवारी(दि 7 जुलै) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आज (सोमवार दि 8 जुलै) सपनाने भाजपाच्या कार्यालयातून पहिल्यांदा मीडियाशी संपर्क साधला आहे. यावेळी तिच्यासोबत तिचे मित्र आणि सह कलाकार खासदार मनोज तिवारी देखील दिसले. आपल्या प्रेस कॉन्फरंसमध्ये सपनाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मला केजरीवाल आवडत नाहीत’ असे तिने म्हटले आहे.

यावेळी मनोज तिवारी यांनी म्हटले की, “कालच(रविवार दि 7 जुलै) आमचं(भाजपाचं) सदस्यत्व नोंदणी अभियान सुरू झालं. 6 जुलै रोजी नरेंद्र मोदींनी वाराणसीतून सदस्यत्व नोंदणी अभियानाला सुरुवात केली आहे. डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै रोजी झाला होता. काही लोक त्यांना विकृत मार्गाने घेतात. मागली वर्षीही 6 जुलै रोजी हे अभियान झाले होते. यावेळी भाजपाने 10 कोटींहून अधिक सदस्य बनवले होते.”

मनोज तिवारी पुढे म्हणाले की, “डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांनी जम्मू काश्मीरमध्ये परमिट घेऊन जाण्यास विरोध केला होता. त्यांनी परमिटचा विरोध केला आणि तिथे त्यांना अटक करण्यात आली. तिथे रहस्यमयी पद्धतीने डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांचं निधन झालं.”

‘सपनाचं भाजपा जॉईन करणं सकारात्मक संकेत’

मनोज तिवारी म्हणाले की, “सदस्यत्व नोंदणी अभियानाद्वारे आम्ही 6 प्रमुख लोकांना भाजपाचे सदस्यत्व दिले आहे. यात सपना चौधरीचाही समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सपनाबद्दल अनेक बातम्या समोर येत होत्या. काहींनी तर सपना काँग्रेस जॉईन करणार असल्याची फसवी माहिती देखील दिली. सपनाचं भाजपा जॉईन करणं हा आमच्यासाठी सकारात्मक संकेत आहे. दिल्लीतील सदस्यत्व नोंदणी अभियान जोरात सुरु आहे.”

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई