निर्भया केस : दोषींना लवकर फाशी द्या, निर्भयाच्या आईचे न्यायालयाबाहेर ‘आंदोलन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाच्या आईने दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी करत न्यायालायाबाहेर आंदोलन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की चारही दोषींना फाशी देण्यात उशीर होत आहे. त्यांच्या विरोधात नवे डेथ वारंट जारी केले जावे.

यापूर्वी निर्भयाच्या दोषींच्या विरोधात नवा डेथ वारंट जारी करण्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. या दरम्यान निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या की, माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मी 7 वर्षांपासून भटकत आहे. दोषी फाशीपासून वाचण्यासाठी नवं नवे मार्ग शोधत आहेत. त्या म्हणाल्या की आता त्यांची ताकद संपत चालली आहे. सुनावणी दरम्यान त्या म्हणाल्या की न्यायालयाने दोषींच्या विरोधात नवे डेथ वारंट जारी करावे. या दरम्यान त्या सुनावणीवेळी बेशुद्ध पडल्या.

निर्भयाच्या आई वडीलांनी आणि दिल्ली सरकारने मंगळवारी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत मागणी केली की दोषींच्या विरोधात नवे डेथ वारंट जारी करावे. पहिल्यांदा 22 जानेवारी दोषींच्या फाशीची तारीख निश्चित झाली होती, ज्यानंतर 17 जानेवारीला आदेश आला की 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता दोषींना फाशी देण्यात येईल. त्यानंतर न्यायालयाने 31 जानेवारीला पुढील आदेशापर्यंत डेथ वारंट रोखले.