Delhi Violence : दिल्ली पोलिस दलातील हवालदार दीपक दहिया यांच्यावर पिस्तूल रोखणारा शाहरूख अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आणि समर्थन दरम्यान उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मौजपूर हिंसाचाराच्या वेळी दिल्ली पोलिसचे हवालदार दीपक दहिया याच्यावर पिस्तुल ताणणाऱ्या शाहरुखला गुन्हे शाखेने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखला उत्तर प्रदेशमधील बरेलीजवळ अटक करण्यात आली आहे. त्याला पकडण्याची जबाबदारी स्पेशल सेलला देण्यात आली होती. परंतु गुन्हे शाखेला यात यश आले.

शाहरुखच्या शोधात पोलीस दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये स्पेशल सेलकडून छापेमारी करत होती. शाहरुखला अटक करणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान होते. अखेर त्याला पकड्ण्यात गुन्हे शाखेला यश आले.

शाहरुखच्या शोधात दिल्ली पोलीस बरेलीमध्ये तळ ठोकून होती

दंगलीत सात गोळ्या झाडणाऱ्या शाहरुखला पकडणे हे दिल्ली पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. २६ फेब्रुवारी रोजी स्पेशल सेलला शाहरुखला पकडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. स्पेशल सेल सहा दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील बरेलीच्या काही शहरांमध्ये तळ ठोकून होते. पंजाब, मुझफ्फरनगर आणि कैराना या शाहरुखच्या संभाव्य ठिकाणांवर स्पेशल सेलने छापे टाकले होते. तसेच शाहरुखच्या घरातील सर्व सदस्यही फरार असल्याचे समोर आले.

शाहरुख उस्मानपूरच्या अरविंद नगर, गल्ली क्रमांक पाच यू-१०८ येथे राहतो. सध्या त्याच्या घराला कुलूप आहे. शेजारच्या लोकांनी सांगितले की १९८५ नंतर त्याचे वडील शवर पठाण येथे आले होते. तो एक मोठा ड्रग माफिया आहे. शाहरुख बरेलीतील ड्रग्स माफियांमध्ये लपला होता असा पोलिसांना संशय आला होता.