Corona च्या विळख्यात सापडले दिल्लीचे DCP, आतापर्यंत 1300 पोलीस कर्मचार्‍यांना संसर्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. यादरम्यान पोलीस कर्मचारी आणि अधिकारीसुद्धा यातून वाचू शकलेले नाहीत. तर, नवी दिल्लीचे डीसीपी कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर डीसीपी ऑफिस सॅनिटाईज करण्यात येत आहे.

आतापर्यत दिल्ली पोलिसांचे 1300 जवान कोरोना पॉजिटीव्ह

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी कोरोना संसर्गाची एका दिवसात विक्रमी 2877 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यासोबत आता दिल्लीमध्ये कोरोना प्रकरणांची एकुण संख्या 49979 झाली आहे. म्हणजे एकुण रूग्णांचा आकडा 50 हजारच्या जवळपास पोहचला आहे, तर 21341 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. कोविड संसर्गामुळे आतापर्यंत 1969 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सुमारे 1300 पोलीस कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह आढळले आहे, हा आकडा चिंताजनक आहे.

नवी दिल्ली डीसीपींच्या पॉजिटीव्ह रिपोर्टने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या महितीनुसार काही दिवसांपूर्वी सॅम्पल घेण्यात आले होते, ज्याचा रिपोर्ट आज आला आणि तो पॉजिटीव्ह आहे. यानंतर त्यांचे कार्यालय सॅनिटाईज केले जात आहे, जेणेकरून अन्य लोकांना संसर्ग होऊ नये.