धोनीवर १-२ सामन्यांची बंदी घालायला हवी होती : विरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भर मैदानात जाऊन पंचांशी हुज्जत घालण्याच्या चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कृतीवर भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने टीका केली आहे. धोनीने आचासहिंतेच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याच्यावर ५०% दंड आकारण्यात आला आहे. परंतु दंड भरल्यानंतरही धोनी खूप स्वस्तात सुटला, असे मत भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. सेहवाग म्हणाला की, धोनीवर किमान १-२ सामन्यांची बंदी घालायला हवी होती. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यानी हे विधान केले आहे.

सेहवाग म्हणाला की , धोनी आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघासाठी वागला तसा भारतीय संघासाठी वागला असता तर मला आनंद झाला असता. चेन्नईच्या संघासाठी धोनी जास्तच भावनिक झाला. दोन फलंदाज खेळपट्टीवर उभे असाताना धोनीला मैदानावर जाण्याची आवश्यकता नव्हती. परंतु धोनी याप्रकरणी खूप स्वस्तात सुटला आहे. धोनीवर १-२ सामन्यांची बंदी झाली असती, तर यामुळे इतर खेळाडूंना धडा मिळाला. या अशा घटना म्हणजे पंचांचा सामन्याच्या मध्य़े अपमान केल्यासारखे आहे.

काय आहे प्रकरण –
गुरुवारी जयपूरमध्ये राजस्थानविरुद्धच्या झालेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाला २ चेंडूत ६ धावांची गरज होती. बेन स्टोक्स गोलंदाजी करत होता आणि मिशेल सँटनर हा फलंदाजी करत होता. षटकातला चौथा चेंटू बेन स्टोक्सने फुलटॉस टाकला, त्यानंतर पंच नो बॉलच्या इशारा करु लागले. परंतु दुसऱ्या पंचांनी यास नकार देताच त्यांनी हात मागे घेतला. यामुळे आधी फलंदाज रवींद्र जाडेजाने आक्षेप नोंदवत भांडायला सुरुवात केली. त्याच्या मदतीला धोनी धावून आला आणि त्यानेही पंचांशी हुज्जत घातली. कॅप्टन कूल म्हणून संबोधल्या जाणाऱ्या धोनीची ही कृती सर्वांना आश्‍चर्यचकित करणारी ठरली होती. त्यावर माजी खेळाडूंनी जोरदार टीकाही केली.

You might also like