माजी अर्थमंत्री ‘अरुण जेटली’ दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची तब्येत मागील काही दिवसांपासून खराब होती, आता त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येत अचानक खालावल्याने आणि श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून त्याची तब्येत कमजोर होती, यामुळे परदेशात देखील त्यांच्यावर उपचार सुरु होते. 2018 साली त्यांचे किडनी ट्रांसप्लंटचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर उपचार पूर्ण करुन ते पुन्हा भारतात दाखल झाले होते. परंतू काही दिवसांपासून तब्येत व्यवस्थित असताना त्यांना पुन्हा एकदा त्रास होण्यास सुरुवात झाला. आज संध्याकाळी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अचानक त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता, त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दिल्लीच्या एम्समध्ये ते उपचार घेत आहे.

आरोग्यविषयक वृत्त