सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरातही ‘कोरोना’चा ‘शिरकाव’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आता दिल्लीत सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे संबंधित न्यायाधिशाने स्वतःला क्वारंटाइन केले आहे. त्यांच्या घरातील आचारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्यावर सेल्फ क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरातील आचारी काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे तो 7 मेपासून रजेवर गेला आहे. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. खबरदारी म्हणून न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सेल्फ क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे दिल्ली बार कौन्सिलमध्ये चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, देशातला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 80 हजार 759 वर पोहोचली आहे.

त्यामुळे केंद्र सरकारला धडकी भरली आहे. भारतासाठी आता मे आणि जून महिला निर्णयाक ठरणार आहे. गेल्या दोनच दिवसांमध्ये तब्बल 10 हजार रुग्णांची भर पडली आहे. देशातल्या 11 राज्यांमधल्या रुग्णांची संख्या एकत्रित केल्यानंतर तो आकडा 80 हजारांच्या वर गेला आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन असताना ही परिस्थिती आहे. तर जेव्हा लॉकडाऊन शिथिल केले जाईल तेव्हा कशा प्रकारचा उद्रेक होईल याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.