बदलले ‘DL’ संबंधित ‘हे’ नियम, ‘या’ लोकांना पुन्हा द्यावी लागणार ड्रायव्हिंग ‘टेस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतेच सरकारने नवीन वाहन कायदा लागू केला आहे. या नवीन कायद्यानुसार वाहन परवान्याच्या नियमांबाबत देखील बदल करण्यात आलेले आहेत. यानुसार आता वाहन परवाना रिन्यूव्ह करण्यासाठी देखील पुन्हा ड्राइव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स एका वर्षांपूर्वी एक्सपायर झालेले असेल आणि तुम्हाला ते पुन्हा रिन्यूव्ह करायचे असेल तर ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे.

या आधी हा नियम पाच वर्षांसाठी होता म्हणजेच लायसन्स एक्सपायर होऊन जर पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेला असेल तर पुन्हा एकदा टेस्ट द्यावी लागत होती. नव्या नियमानुसार आता हा कालावधी कमी करून एका वर्षांसाठी करण्यात आलेला आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा लागू केला. त्यानंतर अनेक लोकांनी पुन्हा ड्रायविंग टेस्ट कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना हे सांगण्यात आले की जर तुमचे लायसन्स एका वर्षांपासून संपलेले आहे अशा वेळेस जर तुम्ही वाहन चालवणे सोडलेले असेल तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एक वर्षांपासून लायसन्स बंद असलेल्या सर्वांना आता ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे.

Visit : Policenama.com