New Driving Licence Rules | Driving Licence बनवणे झाले सोपे, आता उभे राहावे लागणार नाही RTO च्या लाईनमध्ये; नियमांमध्ये करण्यात आला बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – New Driving Licence Rules | तुम्हालाही ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने (Union Ministry of Road and Motorways) या जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमानंतर आता तुम्ही वाहन न चालवताही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता. म्हणजेच आता तुम्हाला RTO कार्यालयात रांगेत उभे राहण्याची गरज नाही (New Driving Licence Rules).

 

नव्या नियमानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यात ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ही ट्रेनिंग सेंटर्स राज्य परिवहन प्राधिकरण किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत असतील. आता ज्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे, त्यांना अशा ट्रेनिंग सेंटर्समधून प्रशिक्षण घेऊन प्रथम सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे. (New DL Rules)

 

यासाठी ज्यांना मोटर ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे आहे, त्यांना अशा सेंटर्समध्ये नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ही सेंटर्स अर्जदाराची परीक्षा घेतील जी उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. यानंतर हे सेंटर सर्टिफिकेट देईल, त्यानंतरच लोकांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करता येईल. या ट्रेनिंग सेंटर्सची वैधता पाच वर्षांसाठी असेल, त्यानंतर त्याचे नूतनीकरण करावे लागेल. (New Driving Licence Rules)

 

ट्रेनिंग सर्टिफिकेटच्या आधारे मिळेल लायसन्स

ट्रेनिंग सर्टिफिकेटच्या आधारेच लोकांना त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.
यासाठी आरटीओमध्ये जाऊन कोणतीही चाचणी देण्याची गरज भासणार नाही.
या सेंटर्समध्ये प्रॅक्टिकल आणि थिअरी असे दोन्ही विषय शिकवले जातील.

ही ट्रेनिंग सेंटर्स सिम्युलेटरने सुसज्ज असतील आणि ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकही उपलब्ध असतील.
या सेंटर्समध्ये लाईट मोटार व्हेईकल, मीडियम आणि हेवी मोटर व्हेईकल या सर्वांचे प्रशिक्षण दिले जाईल.
लाईट मोटार व्हेईकलसाठी 1 महिन्यात 29 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.

 

Web Title :- New Driving Licence Rules | central ministry changed rule to get driving licence easily see full detail

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा