New Education Policy | पुढील वर्षी दहावी- बारावी बोर्डाची परीक्षा होणार का नाही?, याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्षांचे स्पष्टीकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – New Education Policy | आज राज्यभरात बारावीचा निकाल (HSC Result) लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र ही बारावीची परीक्षा शेवटची असून यापुढे दहावी व बारावीचे पेपर होणार नसल्याचा मेसेज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामुळे पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या देशभरात नव्या शैक्षणिक धोरणाची चर्चा (New Education Policy) सर्वत्र आहे. याचा गैरफायदा घेत समाज माध्यमांवर दहावी व बारावी परिक्षांच्या बाबतीत अफवा पसरवली जात आहे. याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी स्पष्टीकरण देत पुढील वर्षीही दहावी (SSC) आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे सांगितले.

आज बारावीचा निकाल जाहीर करताना गोसावींनी (New Education Policy) पुढील परीक्षेबाबत असलेल्या संभ्रमाबद्दल स्पष्टीकरण दिले. गोसावी म्हणाले, की नव्या शैक्षणिक धोरणात दहावी-बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ त्या परीक्षा सत्र पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत सांगितले आहे. त्याशिवाय पाचवी (5th) आणि आठवीच्याही (8th) परीक्षा घेण्याबाबत नमूद केलेले आहे. त्यामुळे पुढील वर्षीही प्रचलित पद्धतीनेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे.

 

 

Web Title :  New Education Policy | Explanation of the president of the state board about why
the 10th-12th board exam will not be held next year?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा