आता WhatsAppचॅटिंगमध्ये येणार नवा ट्विस्ट ; Emojis मध्ये ‘हा’ केला बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp आणि Facebook सारख्या सोशल मीडियाचा वापर करणारा प्रत्येक व्यक्ती चॅटिंग करताना ईमोजीचा वापर करतो. मेसेज टाईप करण्यापेक्षा इमोजीच्या माध्यमातून संवाद साधणं अनेकांना जास्त सोयीचं वाटत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवर इमोजीच्या माध्यमातून चॅटींगची गंमत आणखी वाढत असते. व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगमध्ये नवा ट्विस्ट येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या डूडल फीचरमध्ये काही विशेष बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यानंतर डूडल फीचरमधील जुने Emojis गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल Emojis येणार आहेत.

असे करा Emojis अपडेट –
सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डूडलमध्ये अनेक कस्टमाइज स्टीकर्स आहेत, जे मीडिया फाइल पाठवताना एडिट ऑप्शन सिलेक्ट करून फोटोवर लावता येतात. व्हॉट्सअ‍ॅपमधील हे अपडेट्स पाहायचे असतील तर फिचर Enable करावं लागेल त्याशिवाय ते Doodle UI मध्ये दिसणार नाहीत हा बदल घडवून आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ने बीटा व्हर्जन 2.19.106 मधले जुने Emojis काढून त्याठिकाणी नवे Emojis टाकले आहेत.

आजकाल अनेकजण आहेत जे सोशल मीडियावर इमोजीच्या माध्यमातून व्यक्त होतात आणि आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहचवतात. दिवसेंदिवस इमोजीच्या वापरातही वाढ होत आहे. सोशल मीडियावर दररोज एकूण ९० कोटी युजर्स एकमेकांना इमोजी सेंड करतात. या प्रत्येक इमोजीचा अर्थ जाणून घेण्यासाठी इमोजीपीडियासुद्धा बनवण्यात आली आहे. युनिकोड स्टँडर्ड लिस्टमध्ये २६६६ इमोजी आहेत.

Loading...
You might also like