New English Medium School (NEMS) Pune | न्यू इंग्लिश मिडीयम प्राथमिक शाळेत भोंडला आणि गरबा जल्लोषात साजरा झाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – New English Medium School (NEMS) Pune | दोन वर्षांनी पुन्हा अंबाबाईच्या गजरात न्यू इंग्लिश मिडीयम प्राथमिक शाळेने सकाळ व दुपार सत्रात भोंडला आणि गरबा अतिशय उत्साहात साजरा केला. यासाठी १ली ते ७वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषेत गरबा नृत्य केलं.

 

 

यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. इयत्ता २री ची विद्यार्थिनी नीरजा गंधीलेने गोंधळ आणि महिषासुर वध नृत्यातून सादर केले तर इयत्ता ५वी सकाळ आणि दुपार सत्राच्या विद्यार्थ्यांनी देवीच्या नऊ रूपाचे नृत्य सादर केले. यावेळी इयत्ता ५ वी ची विद्यार्थिनी अनुश्री कुलकर्णी आणि २री ची विद्यार्थिनी आराध्या वडके हिने माहिती दिली. संगीत शिक्षिका अश्विनी पटवर्धन यांनी भोंडल्याची पारंपरिक तसेच आधुनिक गाणी म्हटली आणि सगळ्या विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी भोंडला नृत्य केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांच्या उपस्थितीत आणि शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने सगळा कार्यक्रम पार पडला तसेच सगळ्यांनी भोंडल्याचा आनंद लुटला.

 

Web Title :- New English Medium School (NEMS) Pune News Navratri 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा