अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचा खटला 2 महिन्यात ‘निकाली’ ? मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांच्या विरोधात वाढणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार आता कृतिशील झाले आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की लवकरच देशात आणखी नवे फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करण्याची योजना आहे. ज्यामुळे न्याय मिळण्यास वेग येईल. याबरोबरच अशी व्यवस्था करण्यात येईल, ज्यामुळे या प्रकारच्या केसमध्ये लवकरात लवकर न्याय मिळू शकेल. विशेष करुन अल्पवयीन मुलींबरोबर होणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणांचा 2 महिन्यांत निकाल लावता येईल.

केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारने देशातील 1023 नवे फास्ट ट्रॅक कोर्ट बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. यातील 400 फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करण्यास सहमती मिळाली आहे. सध्या देशात 704 फास्ट ट्रॅक कोर्ट काम करत आहेत.

रविशंकर प्रसाद म्हणाले की मी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना पत्र लिहिणार आहे. यात मी त्यांना आवाहन करेल की बलात्कारची जी प्रकरणं विशेष करुन अल्पवयीन मुलींबरोबरची आहेत त्यांचा निकाल 2 महिन्यांच्या आत लावा. मी माझ्या विभागाला देखील या संबंधित आवश्यक निर्देश देत आहे.

Visit : Policenama.com