Homeताज्या बातम्याNew Feature in Gmail | Gmail मध्ये आले 'हे' शानदार फीचर, आता...

New Feature in Gmail | Gmail मध्ये आले ‘हे’ शानदार फीचर, आता यूजर्स चॅटसोबत करू शकतात Audio आणि Video कॉल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gmail मध्ये आता Google चॅट ऑडियो आणि व्हिडिओ कॉलचे ऑपशन देईल. Googleने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे की, कंपनी प्रामुख्याने अँड्रॉईड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी हे (New Feature in Gmail) अपडेट घेऊन आली आहे. (New Feature in Gmail)

 

परंतु यामध्ये तुम्ही केवळ 1 :1 चॅटपर्यंत ऑडियो आणि व्हिडिओ कॉल करू शकता. यातून आता तुम्ही केवळ आपल्या चॅट लिस्टमध्ये उपलब्ध लोकांना वेगवेगळे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता. इतकेच नव्हे, तुम्ही यामध्ये चॅट हिस्ट्री आणि कॉल तपशील सुद्धा पाहू शकता. या अपडेटची यावर्षी सप्टेंबरमध्ये घोषणा करण्यात आली होती. (New Feature in Gmail)

असा करा कॉल

– तुम्हाला गुगल चॅटच्या लिस्टमध्ये ज्याला कॉल करायचा आहे, त्याचे चॅट उघडा.

ज्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला ऑडिओ आणि व्हिडिओ आयकॉन दिसू लागेल.

कॉल करण्यासाठी तुम्हाला या आयकॉनवर टॅप करावे लागेल.

ज्यावर तुम्ही व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलवर टॅप करू शकता.

सुरू असलेल्या कॉलबाबत जीमेल तुम्हाला ब्लू बॅनरद्वारे सांगेल, जो स्क्रीनच्या टॉपवर असेल.

यामध्ये व्यक्तीचे नाव आणि कॉल ड्यूरेशन असेल.

 

मिस्ड कॉलसाठी लाल रंगाचा दिसेल संकेत
अशाप्रकारे मिस्ड कॉलच्या संकेतबाबत लाल रंगाचा फोन किंवा व्हिडिओ आयकॉन दिसेल. नवीन कॉलिंग अनुभव व्यक्तीगत Google खाते असलेल्या सर्व वापरकर्त्यांसह Google Workspace, G Suite बेसिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी सुद्धा सुरू होत आहे.

कॉलिंग करण्यासाठी आवश्यक आहे की, कॉल करणारा आणि कॉल रिसिव्ह करणारा, दोन्हीही जीमेलच्या नवीन व्हर्जनचा वापर करत असाल. तसेच जीमेल Hangouts सेवा बंद करणार आहे.

 

Web Title :- New Feature in Gmail | this great feature came in gmail now users will be able to make audio and video calls with chat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Symptoms in kids | जास्त ताप-सतत खोकला, मुलांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची ही 6 विशेष लक्षणं; जाणून घ्या

Sitaram Kunte | अनिल देशमुख प्रकरणात सीताराम कुंटेंची 6 तास चौकशी, जाणून घ्या नेमकं काय झालं?

Bombay High Court | ‘…तुमच्याविरोधात कारवाई का करु नये?’ उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Bigg Boss 15 | देवोलिनामुळे राखी सावंत आणि तिचा पती रितेशच्या नात्यात आली ‘दरार’ ! राखीने बजावलं रितेशला, म्हणाली…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News