मास्टरकार्डनं SBI अ‍ॅपवर सुरू केली ‘ही’ नवी सुविधा, कोट्यावधी ग्राहकांना मिळणार लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक ऑफ इंडियाने नुकतीच कॉन्टॅक्टलेस पेमेंट सुरू करण्याची घोषणा केली. त्यात त्यांनी कॉन्टॅक्टलेस पेमेंट सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया नावाजलेली आहे. या घोषणेत बँकेने सांगितले, की “मास्टर कार्ड कॅस्टमर्सना आता पैसे काढण्यासाठी कार्ड घेऊन जाण्याची गरज भासत नाही. तर ग्राहक संपर्कशिवाय टॅप ॲण्ड गो चा वापर करून पेमेंट करू शकतील. एसबीआय कार्ड आपल्या ॲपवर मास्टरकार्ड टोकन सर्व्हिस देणारी देशातील पहिला कार्ड जारीकर्ता बनली आहे.”

मास्टर कार्ड आणि एसबीआय कॉर्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (एसबीआय कार्ड) ने आज एसबीआय कार्ड ॲपवर कॉन्टॅक्टलेस पेमेंट सुरू करण्याची घोषणा करत, त्यासाठी ग्राहकांना कार्ड स्वाईप करण्याची, टच करण्याची किंवा पिन नंबर टाकण्याची गरज नाही गरज पडणार नाही.

या सुविधेचा वापर करून ग्राहक एका वेळी दोन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतील. दोन हजार रुपयांहून अधिक व्यवहारांसाठी कार्ड पिन नोंदवावी लागेल. एसबीआय कार्ड ॲप्सचा वापर करण्यासाठी ग्राहकांना एसबीआय कार्ड मोबाइल ॲप्स आपल्या कार्डचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी ॲप्सचे नवीन व्हर्जन आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन नंतर पॉईंट ऑफ सेल्स मशीनवर कार्ड पकडता फोनच्या माध्यमातून व्यवहार करता येईल.

ग्राहकांचे जीवन सरळ आणि चांगले बनविण्यासाठी कटिबद्ध- एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ अश्विनीकुमार तिवारी

सध्याच्या परिस्थितीत गेल्या काही महिन्यांमध्ये कॉन्टॅक्टलेस पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आम्ही एसबीआय कार्ड माध्यमातून ग्राहकांचे जीवन सरळ आणि चांगले बनविण्यासाठी कटिबद्ध आहोत. सरकारसोबतची भागीदारी ग्राहकांना सुविधाजनक डिजिटल पेमेंट ऑप्शन देण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

यावेळी, मास्टरकार्ड चे विभागीय अध्यक्ष पोरश सिंह यांनी सांगितले, की मास्टर कार्ड भारताच्या सर्वात मोठ्या बँकेसोबत भागीदारी मजबूत करत आहे. सरकारला विश्वास आहे की ही सेवा एसबीआयच्या कार्ड धारकांसाठी एक उत्तम मोबाईल बेस्ड पेमेंट सर्व्हिस म्हणून समोर येईल.