फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर

मुंबई  : वृत्तसंस्था

सोशल मिडियावर काही क्षणातच अफवांचे मेसेज व्हायरल झाल्याने अनेकजण अफवांचे बळी ठरले आहेत. अफवांचे होणारे व्हायरल मेसेज सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. अशा फेक न्यूजमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा फेक न्यूजला लगाम घलण्यासाठी व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले असून या फीचरच्या मदतीने संशयास्पद लिंक पडताळून पहता येणार आहे.

[amazon_link asins=’B01EU2M62S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’957069d8-828a-11e8-aba4-83b145173fa9′]

व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अनेकांना जीव गमवावे लागले आहेत तर काहींना गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला आहे. अशा घटना राज्यासह देशात अनेक ठिकाणी पहायला मिळाल्या आहेत आणि पहायला मिळत आहेत. त्यामुळे अशा फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी सरकारही पुढे सरसावले आहे. फेक न्यूजवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाय योजना आहेत का असा सवाल केंद्र सरकारने व्हॉट्स अॅप, फेसबुक आणि ट्विटर या कंपन्यांना केला आहे.

[amazon_link asins=’B077PW9VBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a26cd854-828a-11e8-adab-2b5e19202d06′]

भविष्यातील हा धोका ओळखून व्हॉट्सअॅपवर अशा फेक न्यूज नियंत्रणात आणण्यासाठी एक टूल येणार आहे. फेक न्यूज नियंत्रणात आणण्यासाठी ‘सस्पिशिअस लिंक डिटेक्शन’ नावाचे फिचर व्हॉट्स अॅप देणार असल्याची माहिती wabetainfo या वेबसाईटने दिली आहे. या नव्या फीचरच्या मदतीने युजरला व्हॉट्स अॅपवरील मेसेज फेक आहे की नाही याची चाचपणी करणे शक्य होणार आहे.
‘सस्पिशिअस लिंक डिटेक्शन’ फीचरच्या माध्यमातून युजरला एखादी लिंक आल्यास ती फेक आहे का? लिंकमध्ये काही संशयास्पद कंटेंट आहे का? याची खातरजमा व्हॉट्स अॅपकडून केली जाणार आहे. लिंक संशयास्पद किंवा धोकादायक असल्यास लिंकवर लाल रंगाचा धोक्याचा इशारा देण्यात येणार आहे. हा धोका दुर्लक्ष करत युजरने ही लिंक ओपन केल्यास पुढील सर्व जबाबदारी युजरची असणार आहे.