OMG ! रिलीजच्या दुसऱ्या दिवशी अमिताभ यांचा ‘बदला’ झाला लिक

मुंबई : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांची पायरेसी होण्याचे प्रमाण वाढत आहे. आता अमिताभ बच्चन यांचा ‘बदला’ चित्रपट रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी लीक झाला आहे.

आता पर्यंत लुका-छुपी, गली बॉय, पेटा, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, मणिकर्णिका, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, असे प्रसिध्द चित्रपट लिक झाल्यानंतर ‘बदला’ चित्रपट लीक झाला आहे.

या वाढत्या पायरेसीमुळे निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत हिंदीसोबत काही इंग्रजी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळी चित्रपट लिक झाले आहेत. गेल्या वर्षभरात अनेक चित्रपट लिक झाले आहेत. या चित्रपटाच्या पायरेसीमुळे चित्रपटांना नुकसान होऊन चित्रपटाच्या कमाईत ही नुकसान सहन करावे लागत आहे.

‘बदला’ चित्रपट हा एक थ्रीलर ड्रामा असून यात अमिताभ बच्चन सोबत अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट शाहरुख खानच्या रेड चिलीजने निर्मिती केली आहे.