New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली ! महिंद्राने केली 2022 Scorpio N SUV च्या लाँचच्या तारखेची घोषणा; जाणून घ्या फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – New Generation Mahindra Scorpio N | महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra And Mahindra) नवीन पिढीच्या Scorpio बद्दल आणखी एक मोठी माहिती दिली आहे, कंपनीने सांगितले की नवीन SUV भारतीय बाजारपेठेत 27 जून 2022 ला लाँच होणार आहे. कंपनी Scorpio N नावाने नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे आणि विशेष म्हणजे तिच्या सध्याच्या मॉडेलची विक्री Scorpio Classic या नावाने सुरू ठेवली जाईल. (New Generation Mahindra Scorpio N )

 

महिंद्राचे (Mahindra Group) म्हणणे आहे की, ती तरुण आणि तंत्रज्ञान पसंत असलेल्या ग्राहकांसाठी डिझाइन केले आहे ज्यांना फुल साइज एसयूव्ही चालवायला आवडते. कंपनीने असेही म्हटले आहे की नवीन स्कॉर्पिओ ठळक डिझाइन आणि कमांडिंग ड्रायव्हिंग पोझिशनसह ऑफर केली जाईल.

 

एसयूव्हीचे बिग डॅडी !
2022 स्कॉर्पिओचा टीझर रिलीज करताना, महिंद्रा ऑटोमोटिव्हने त्यास SUV चा बिग डॅडी अशी टॅगलाइन दिली आहे.
कंपनीने नवीन स्कॉर्पिओ एन सोबत अनेक नवीन आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्स दिले आहेत ज्यामुळे ती सध्याच्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. (New Generation Mahindra Scorpio N)

 

महिंद्रा अँड महिंद्राचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, स्कॉर्पिओ हे महिंद्राचे ऐतिहासिक मॉडेल आहे ज्याने या श्रेणीसाठी एक स्थान निर्माण केले आहे आणि ऑटोमोबाईल उद्योगातील एक प्रतिष्ठित ब्रँड बनला आहे.

नवीन Scorpio N पुन्हा एकदा एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन बेंचमार्क सेट करेल.
नवीन स्कॉर्पिओद्वारे ग्राहकांना वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट आणि उत्तम अनुभव देण्याचे आमचे ध्येय पूर्ण होईल.

 

पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्याय
नवीन Mahindra Scorpio N पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल,
जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेसशी जुळलेले आहेत.
याशिवाय, नवीन एसयूव्ही 4 बाय 4 पर्यायांसह देखील सादर केली जाईल.

 

2020 आणि 2021 मध्ये लाँच केलेल्या नवीन Mahindra Thar आणि नवीन XUV700 च्या धर्तीवर, 2022 Scorpio N ला देखील ग्राहकांची जोरदार मागणी मिळण्याची अपेक्षा आहे.
वृत्तानुसार, नवीन स्कॉर्पिओसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण सप्लाय चेन आणि सेमीकंडक्टर चिपचे संकट आतापर्यंत ऑटो उद्योगावर कायम आहे,
अशावेळी, अशी अपेक्षा आहे की मागणीनुसार पुरवठा करण्यात अडचणी येतील.

 

Web Title :- New Generation Mahindra Scorpio N | mahindra announced launch date of all new scorpio n suv in india features engine interior

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा