११ राज्यात लवकरच नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या, भाजपच्या ‘या’ ९ बडया नेत्यांची नावे चर्चेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांनंतर आता अनेक राज्यातील राज्यपालांचे कार्यकाळ संपत आले असल्याने त्यांच्या जागेवर नवीन नियुक्त्या होणार आहेत. काल केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी सुषमा स्वराज यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर या चर्चा वेग धरू लागल्या आहेत. जवळपास ११ राज्यातील राज्यपालांची मुदत संपत आली आहे. त्यामुळे त्यांना कार्यकाळ वाढवून नाही मिळाला नाही तर त्यांच्या जागी दुसऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यातील राज्यपालांची मुदत लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता यांच्या जागी कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या राज्यपालांमध्ये अनेक महत्वाचे आणि जेष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

जेष्ठ नेत्यांचा या नावांत समावेश

लोकसभा निवडणूक पार पडली, मात्र या निवडणुकीत ज्या जेष्ठ नेत्यांना तिकीट न देता पक्षाच्या संघटनात काम करायला सांगितले होते. अशा सर्व जेष्ठ नेत्यांची या ठिकाणी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मुरली मनोहर जोशी, बंडारू दत्तात्रेय, कलराज मिश्र, करिया मुंडा, भगत सिंह कोश्यारी, बिजोय चक्रवर्ती, सुमित्रा महाजन यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, ज्या राज्यपालांची मुदत संपत आहे, त्यातील बहुतांश राज्यपालांचे वय हे ७० ते ८० च्या पुढे असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

Loading...
You might also like