1 नोव्हेंबरपासून LPG सिलेंडरच्या होम डिलिव्हरीची संपुर्ण सिस्टीम बदलणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिलेंडरच्या चोरीला आळा घालण्यासाठी आणि योग्य ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीच्या नियमात पुढील महिन्यांपासून बदल करणार आहेत. या नव्या सिस्टीमला DAC (डॅक) अस नाव असून डिलिव्हरी ऑंथेटीकेशन कोड असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आता बुकींग करून आपल्या घऱापर्यंत सिलेंडर येणार नाही. तर त्यासाठी आपल्या रजिस्टर मोबाईन क्रमांकावर एक कोड पाठवण्यात येईल. तुम्ही डिलिव्हरी बॉयला हा कोड दाखवल्यानंतरच तुम्हाला सिलेंडर दिला जाणार आहे. जयपूरमध्ये प्रायोगित तत्वावर ही यंत्रणा लागू करण्यात आली आहे.

तेल कंपन्या सर्व प्रथम नवीन यंत्रणा 100 स्मार्ट सिटीमध्ये लागू करणार आहे. त्यानतंर हळूहळू इतर शहरात ही यंत्रणा कार्यान्वीत होणार आहे. नवीन यंत्रणा कार्यान्वीत झाल्यानंतर चुकीचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेल्या ग्राहकांच्या अडचणी वाढतील त्यांच्या घरी होणारी सिलेंडरची डिलिव्हरी रोखली जाणार आहे. तसेच एखाद्या ग्राहकांने वितरकाकडे मोबाईल नंबर अपडेट केले नसल्यास डिलीव्हरी बॉयकडे असलेल्या ॲपच्या मदतीने रियल टाईम नंबर अपडेट करता येणार आहे. त्यानंतर कोड जनरेट करणार येईल. ही यंत्रणा केवळ घऱगुती वापरासाठीच्या सिलेंडरसाठी आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरसाठी ही यंत्रणा लागू राहणार नाही. प्रायोगिक तत्वावर लागू केलेल्या यंत्रणेला 95 टक्के यश मिळाले आहे.